शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’बदल्यांना स्थगिती

By admin | Updated: June 6, 2016 00:19 IST

औरंगाबाद : अंबड तालुक्यातील सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी न करण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. पाटील यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : अंबड तालुक्यातील सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी न करण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. पाटील यांनी दिले आहेत. ग्रामविकास विभागामार्फत १८ एप्रिल २०१४ व १५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ठरविलेले आहे. १५ मेच्या शासन निर्णयानुसार बदल्यांचा प्राधान्यक्रम नमूद केला आहे. त्यानुसार नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील कर्मचारी, आजारी कर्मचारी, आजी, माजी सैनिकाची पत्नी, कुमारिका कर्मचारी, विधवा कर्मचारी, ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी, पती-पत्नी एकत्रीकरण कर्मचारी यांच्या बदल्यांना प्राधान्य देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्याचे सूचित केले आहे. अंबड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरीलप्रमाणे प्राधान्यक्रम देऊन बदल्यांसाठीची सेवाज्येष्ठता यादी ३० मे २०१६ रोजी प्रसिद्ध केली. परंतु राजकीय दबावापोटी गटशिक्षणाधिकाऱ्यांंनी १ जून २०१६ रोजी १५ मे च्या शासन निर्णयातील प्राधान्यक्रम लक्षात न घेता फेरसेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली. त्याद्वारे पती-पत्नी एकत्रीकरण धोरण डावलले. बदली प्रक्रिया ३ जून २०१६ रोजी ठेवली. त्यामुळे लक्ष्मण नागरे व इतर कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रियेस आव्हान दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी युक्तिवाद करून वरील बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. फेरसेवाज्येष्ठता यादी नियमबाह्य असून, त्यास स्थगिती देण्याची विनंती केली. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. तळेकर काम पाहत आहेत. त्यांना अ‍ॅड. अमोल चाळक सहकार्य करीत आहेत. शासनातर्फे अ‍ॅड. ए. जी. मगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)राजकीय दबावापोटी गटशिक्षणाधिकाऱ्यांंनी १ जून २०१६ रोजी १५ मे च्या शासन निर्णयातील प्राधान्यक्रम लक्षात न घेता फेरसेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली. त्याद्वारे पती-पत्नी एकत्रीकरण धोरण डावलले.