उस्मानाबाद : अपहार, मारामारीसह अपघात प्रकरणात चौकशीदरम्यान दोषी आढळल्याने उस्मानाबाद विभागातील सहा वाहकांसह एका चालकाला निलंबित करण्यात आले आहे़ तर एका लिपिकासही कारवाईचा झटका बसला असून, निलंबन काळात संबंधित आगारात हजेरी लावण्याचे आदेशित करण्यात आले आहे़राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागांतर्गत व बाहेरील जिल्ह्यातील विभागाच्या तपासणी पथकाकडून वारंवार बसेसची तपासणी करण्यात येते़ या तपासणीमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून दंड अथवा प्रवासाच्या तिकीटाचे पैसे वसूल करण्यात येतात़ याच अनुषंगाने या पथकाकडून वाहकाकडे असलेल्या रक्कमेची, तिकीटाचीही तपासणी करण्यात येते़ या तपासणीदरम्यान तिकीटाचे पैसे घेवून तिकीट न देण्याच्या प्रकरणात गत काही महिन्यात महिन्यात अनेक वाहकांवर कारवाई करण्यात आली होती़ तपासणी पथकाकडून याचा अहवाल प्राधिकृत अधिकारी असलेल्या वाहतूक अधीक्षकांकडे पाठविण्यात आले होते़ हे अहवाल आल्यानंतर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण घेत चौकशी करण्यात आली होती़ या चौकशीत नव्या वर्षात सहा वाहक दोषी आढळून आले आहेत़ या वाहकांना निलंबित करण्यात आले असून, संबंधित आगारात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ तर रस्ता अपघात प्रकरणात काही चालकांची चौकशी सुरू होती़ या चौकशीदरम्यान एक चालक दोषी आढल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे़ कार्यालयीन कामकाजात कर्तव्यकसूर केल्याच्या प्रकरणातही एका लिपिकास निलंबित करण्यात आले. नव्या वर्षातच राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागातील एक-दोन नव्हे तब्बल आठ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे़ या कारवाईमुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत़कारवाईबाबत पाठपुराव्याचा अभावपरिवहन मंत्र्यांच्या सूचनेनंतर राज्य परिवहन विभागाच्या विविध पथकांनी गत महिन्यात बोगस पासधारक शोधण्याची धडाकेबाज मोहीम राबविली़ या मोहिमेत ज्येष्ठांचे बोगस पास बाळगणारे ४८२ तर अपंगांचे बोगस पास बाळगणारे ३७६ जण सापडले होते़ संबंधितांची कार्ड गोळा करून पोलिसांकडे देण्यात आली आहेत़ कायदेशीर कारवाई करण्याबाबतही संबंधितांना सूचित केले आहे़ मात्र, कारवाई व्हावी, यासाठी आवश्यक पाठपुराव्याचा अभाव दिसून येत आहे़वेळापत्रक कोलमडलेलेचराज्य परिवहन विभागाच्या उस्मानाबादसह विविध बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहेत़ त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे़ वाहक-चालकांवर कारवाई करण्यासह वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात अकार्यक्षम ठरत असलेल्या संबंधित बसस्थानकातील अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागातील सर्वाधिक निलंबनाचा तडाखा उमरगा आगारातील वाहक-चालकांना बसला आहे़ उमरगा आगारातील एक तीन वाहकांसह एका लिपिकाचा समावेश आहे़ तर भूम, उस्मानाबाद व तुळजापूर तालुक्यातील वाहकांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़४०० प्रकरणे चौकशीवरअपघातातील चालक, अपहार प्रकरणातील वाहकांसह इतर कारणास्तव तक्रारी असलेल्या ३५० ते ४०० कर्मचाऱ्यांची प्रकरणे चौकशीवर आहेत़ या प्रकरणांची चौकशी सुरू असून, यात दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले़
सहा वाहकांसह चालक निलंबित
By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST