शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियागृह पाच महिन्यांपासून बंद !

By admin | Updated: January 15, 2017 01:07 IST

येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रियागृह मागील पाच महिन्यांपासून बंद आहे़

दत्ता पवार येडशीयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शस्त्रक्रियागृह मागील पाच महिन्यांपासून बंद आहे़ परिणामी शस्त्रकिया बंद पडल्या असून, रूग्णांसह नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ रूग्णालय इमारतीचा दोन ठिकाणी स्लॅब कोसळला असून, रूग्णांसह नातेवाईकांचा जीव धोक्यात आला आहे़येडशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे १९८५ साली बांधकाम झाले आहे़ या केंद्रांतर्गत येडशी, जवळा, कुमाळवाडी, आळणी, शिंगोली, गडदेवदरी, जहागीरदारवाडी, उपळा, जहागीरदारवाडी तांडा आदी दहा दहा गावातील नागरिकांना आरोग्याची सेवा देण्यात येते़ येथील बाह्यरूग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कुटूंब नियोजन, गरोदर माता महिला व बालकांना लसीकरणासह राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या लहान मोठ्या अपघातातील जखमींना इथे उपचारासाठी आणले जाते़ या आरोग्य केंद्राला गतवर्षी आनंदबाई जोशी पुरस्कार ने गौरवण्यात आले आहे. अशा या पुरस्कारप्राप्त रूग्णालयाला आता उतरती कळा लागली आहे. गत चार ते पाच महिन्यांपासून येथील शस्त्रक्रियागृह बंद असल्याने येथील शस्त्रक्रिया उस्मानाबाद येथे होत आहेत़ यामुळे येथे कुटंूब नियोजन शस्त्रकिया बंद असल्याने शस्त्रकिया केल्याला महिलांना किमान सात दिवस दवाखान्यात राहावे लागते़ येथील शस्त्रक्रिया बंद असल्याने महिलांसह नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ तसेच बाहेरील पोर्च मध्ये स्लॅबची खालील बाजू कोसळू लागली आहे. यातील कुजलेले लोखंड ही उघडे पडू लागले असून, हा स्लॅब कोसळण्याची भिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे रूग्णांसह कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे़ येथे केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असून, उपचारासाठी येणाऱ्या महिला रूग्णांची संख्या पाहता महिला डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे़.