शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सुधीर गव्हाणे यांच्या समर्थनार्थ विद्यापीठात धरणे आंदोलन

By admin | Updated: November 9, 2016 01:34 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तविद्या व जनसंपर्क विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याविरुद्ध विद्यापीठातील निलंबित कर्मचारी सुभाष बोरीकर

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तविद्या व जनसंपर्क विभागप्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांच्याविरुद्ध विद्यापीठातील निलंबित कर्मचारी सुभाष बोरीकर यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने आज विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात साम्यवादी नेते मनोहर टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत डॉ.गव्हाणे यांच्या समर्थनार्थ १० नोव्हेंबरला पोलीस आयुक्तांना निवेदन देत १५ नोव्हेंबर रोजी विद्यापीठात धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे.सध्या महाराष्ट्रातील वातावरण लक्षात घेता औरंगाबादचे नाव बदनाम होता कामा नये यासाठी सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी व लोकशाहीवादी शक्तींनी या आंदोलनात सहभागी व्हावे व अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका यावेळी घेण्यात आली. प्राचार्य डॉ. एम.ए. वाहूळ, अ‍ॅड. बी. एच. गायकवाड, साथी सुभाष लोमटे, कॉ. एच. एम. देसरडा, के.ई. हरिदास,साथी अण्णा खंदारे, प्रा. माणिक सावंत, प्रा. प्रकाश सिरसाट, कॉ. राम बाहेती, बाबा गाडे, माधव सावरगावे, संजय शिंदे, कॉ. बुद्धिनाथ बराळ,राम पेरकर,प्रा. फुलसिंग जाधव, जयश्री शिर्के, विद्यार्थिनी सोनाली म्हस्के, अमोल खरात आदींनी आपली मते मांडून बोरीकरसारख्या प्रवृत्तींना अटकाव बसलाच पाहिजे, असे मत मांडले. या बैठकीस रतनकुमार पंडागळे, मंगल खिंवसरा, प्रा.विजय पाथ्रीकर, अ‍ॅड. वैशाली डोळस, देवीदास कीर्तिशाही, कॉ. जनार्दन भोवते, चंद्रभागाबाई दाणे, सतीश सुराणा यांच्यासह बोरीकरविरुद्ध तक्रारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी आलेले होते. प्रारंभी, बुद्धप्रिय कबीर यांनी प्रास्ताविक केले. विविध संघटनांची पत्रके....दरम्यान, विविध संघटनांनी आज पत्रके प्रसिद्ध करून डॉ. सुधीर गव्हाणे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या समर्थनार्थ ही निवेदने विद्यापीठाचे कुलगुरू, पोलीस आयुक्त व बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना सादर करण्यात आली. मनपाचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे, प्रा. किसन नरवडे, प्रा. प्रकाश शिरसाट, नगरसेवक गंगाधर ढगे, शांतीलाल दाभाडे व गौतम अडागळे आदींनी बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन सादर केले व त्याची प्रत विद्यापीठाच्या कुलसचिवांना सादर केली. प्रा. दिलीप बडे, प्रा. भाग्योदय घाटे, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. सुखदेव खंदारे, डॉ. प्रकाश डाके, प्रा. समाधान दहिवाल, प्रा. डॉ. ए. पी. सरवदे, राहुल कांबळे, राजकुमार जाधव, डॉ. जी. जी. राजपूत, प्रा. अमोल राजपंखे, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, डॉ. फुलचंद सलामपुरे, राजेश मुंढे, प्रा. संजय पाईकराव, डॉ. किशोर सूर्यवंशी, भीमसेन कांबळे, डॉ. जितेंद्र मगर, अमोल दांडगे आदींनी पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून, डॉ. गव्हाणे यांच्याविषयी जातीयद्वेषातून केलेली तक्रार हा अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा केलेला अनाठायी वापर असल्यामुळे तक्रार गांभीर्याने घेऊ नये असे म्हटले आहे.