शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंटचा संचालक पारखेचा जामीन अर्ज मागे

By admin | Updated: January 13, 2017 21:10 IST

दामदुप्पट परताव्याचे आमीष दाखवून राज्यभरात अनेकांची फसवणूक करणा-या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया, या कंपनीचा संचालक दीपक केडू पारखे

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 13- दामदुप्पट परताव्याचे आमीष दाखवून राज्यभरात अनेकांची  फसवणूक करणा-या सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस इंडिया, या  कंपनीचा संचालक दीपक केडू पारखे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला नियमित जामीन अर्ज मागे घेतला . 
दीपक पारखे व त्याची पत्नी दिव्या ( वय ३२, दोघे रा. मगरपट्टा, पुणे) हे सध्या हर्सूल कारागृहात आहेत .या संचालक दाम्पत्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. दामदुप्पट परताव्यासह कंपनीला सभासद मिळवून दिल्यास परदेश वारीचे आमिषही दाखविण्यात आले होते. आरोपींनी १६ जुलै २०११ रोजी या कंपनीची स्थापना केली होती. जालना रोडवरील घई कॉम्प्लेक्स भागात कंपनीचे मुख्यालय, तर सिंधी कॉलनीत मुख्य शाखा सुरू केली. एक रकमी गुंतवणूक केल्यास आकर्षक मासिक उत्पन्न व त्यासोबतच विविध बक्षिसे, अधिक सभासद केल्यास कार, लॅपटॉप, परदेशी सहल अशी आमिषे दाखविण्यात आली होती. या प्रकरणी जाहिरातबाजी करतानाच, या कंपनीने राज्यभरातून सभासद केले होते. साखळी पद्धतीमुळे सभासदांची संख्या वाढत होती. प्राथमिक माहितीनुसार कंपनीने मराठवाड्यासह राज्यभरात नऊ हजार सभासद केले असून सुमारे ७० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. या कंपनीचे संचालक असलेल्या शिवाजी  पोळ (वय ५०, रा. दिग्रस, जि. परभणी), सतीश पोळ, शेषराव घुले, प्रधान आडे, हरिष साळवे यांच्याविरुद्धही जवाहरनगर पोलिस गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.
पेडगाव परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी येथील नंदा बळीराम पाटील (वय ५०) यांनी २०१२-१३ मध्ये तीन लाख रुपये गुंतविले. यातून दरमहा २० हजार रुपये परतावा मिळणा-या योजनेत त्यांची गुंतवणूक होती. आमिषाला बळी पडून त्यांनी वडील, भाऊ तसेच बहीण अशा नातेवाइकांनाही कंपनीत गुंतवणूक करायला भाग पाडले. त्यांचे एकूण २० लाख ८५ हजार रुपये या कंपनीमध्ये गुंतले आहेत.जानेवारी २०१४पासून त्यांना परतावा मिळाललेला नाही. दीपक पारखे याने नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठात दाखल केला होता . परंतु जामीन मिळत नाही हे लक्षात येताच पारखे याने अर्ज मागे घेतला.सरकारतर्फे सहायक सरकारी वकील सुरेश मुंडे यांनी बाजू मांडली.