शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात सोसावा लागतोय उन्हाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:03 IST

ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. एकीकडे निसर्ग साथ देत नसताना महावितरणनेदेखील अडचणींमध्ये भारनियमनाची भर घातली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सप्टेंबर हा पावसाळा ऋतुतील तिसरा महिना; परंतु उकाडा उन्हाळ्याची अनुभूती देत आहे. ऐन पावसाळ्यात शहरवासीयांना उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. एकीकडे निसर्ग साथ देत नसताना महावितरणनेदेखील अडचणींमध्ये भारनियमनाची भर घातली.भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यातील शहराचे तापमान सरासरी तापमानापेक्षा एक-दोन अंशांनी जास्त आहे. सामान्यपणे या काळात शहराचे तापमान ३० अंशांच्या आत आसपास असणे अपेक्षित आहे. मात्र, मागच्या सहा दिवसांमध्ये तापमानाने दररोज ३० अंशांची पातळी ओलांडली असून ७, १० आणि ११ सप्टेंबर या तीन दिवशी सर्वोच्च ३२.४ अंश तापमानाची नोंद आहे. ‘एवढी गरमी का होतेय’ असे वाटण्याचे हे कारण आहे.भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हा आठवडा सूर्याचा असाच प्रकोप राहील. १८ सप्टेंबरपर्यंत पारा ३२ अंशांवर राहील. रविवारपर्यंत पाऊस जोरदार पडणार नसल्याचे भाकीतही करण्यात आले आहे.सोमवारी रात्री पावसाचे जोरदार आगमन झाल्यानंतर उन्हाचा तडाखा कमी होण्याची शक्यता वाटत होती; परंतु मंगळवारी सकाळपासूनच ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. दुपारनंतर तर गरमी जाणवू लागली. ही गरमी उन्हाळ्याची आठवण करून देणारी होती. ४० अंशांच्या उन्हामध्ये शहर चांगलेच भाजून निघाले होते. पावसाळ्यात तरी यापासून मुक्ती मिळेल, अशी अपेक्षादेखील फोल ठरत आहे.