शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘सुमित’ साठी तब्बल नऊ लाख रु. जमा!

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : स. भु. विद्यामंदिरात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमित सरदेशपांडे या विद्यार्थ्याचा शाळेतच अचानक ब्रेन हॅमरेज झाला.

औरंगाबाद : स. भु. विद्यामंदिरात इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुमित सरदेशपांडे या विद्यार्थ्याचा शाळेतच अचानक ब्रेन हॅमरेज झाला. शिक्षकांनी वेळीच त्याला दवाखान्यात दाखल केल्याने पुढील संकट टळले. सुमितवर औषधोपचार करण्यासाठी डॉक्टरांनी तब्बल १२ लाख ७० हजार रुपयांचा खर्च सांगितल्याने त्याच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच घसरली. ‘लोकमत’ने सुमितच्या औषधोपचारासाठी दानशूर मंडळींना एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा आवाहन केले. त्यामुळे आजपर्यंत नऊ लाख रुपये जमा झाले आहेत.‘लोकमत’ने पुढाकार घेतला नसता तर आज एवढी मोठी रक्कम जमा झालीच नसती; आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांचा जेवढा वाटा आहे, तेवढाच लोकमतचा असल्याचे सुमितचे वडील सुशील सरदेशपांडे यांनी सांगितले. ‘लोकमत’ने १७ सप्टेंबर रोजी सर्वप्रथम ‘पैशाअभावी कामगाराच्या मुलाची मृत्यूशी झुंज’या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच सिग्मा हॉस्पिटल येथे दानशूर मंडळींनी मदतीसाठी अक्षरश: रांग लावली. त्यानंतर स.भु. शिक्षण संस्थेने सर्वात मोठी २ लाख ७३ हजार रुपयांची मदत केली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, स्वामी विवेकानंद अकॅडमी, बोर्डे कोचिंग क्लासेस, स. भु. महाविद्यालय, गायत्री मेडिकलतर्फे १ लाख, अशी अनेक ठिकाणी वर्गणी जमा करण्यात आली.सरदेशपांडे कुटुंबीय बीड बायपासवर अरुणोदय कॉलनीत राहतात. कॉलनीतील नागरिकांनी सुमित आपलाच मुलगा आहे, त्याच्या आयुष्याची दोर आणखी मजबूत झाली पाहिजे, अशी प्रेरणा घेऊन नागरिकांनी मोठी वर्गणी जमा केली. सुमित सरदेशपांडेच्या डोक्यात पुन्हा भविष्यात रक्तस्राव होऊ नये म्हणून काही औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करायच्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या डोक्यात अचानकपणे दुखत असल्याने त्याला सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उद्या सोमवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. युरोप येथून मागविण्यात आलेले औषध त्याच्या शरीरात सोडण्यात येणार आहे. शहरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच माझ्यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे ऋण माझे कुटुंब कधीच फेडू शकणार नाही, असेही सुशील सरदेशपांडे यांनी नमूद केले. आज जे संकट आमच्या कुटुंबावर कोसळले आहे, असे संकट कोणावरही येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी नमूद केले. आभार व्यक्त करताना सुशील सरदेशपांडे यांचा कंठही दाटून आला होता.