सितम सोनवणे , लातूरइयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असताना चित्रकलेचा विषय होता. शिक्षकांनी चित्र रेखाटण्याचे दिलेले धडे कायम स्मरणात राहतील, असे विद्यार्थी ठराविकच असतात. मात्र एखादी गोष्ट डोक्यात बसली की, ती तात्काळ रेखाटून काढावी, असा छंदच दयानंद विज्ञान महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात असलेल्या सुहास सुग्रीव खाडे याला जडला आहे. त्याने रेखाटलेल्या चित्रांची भुरळ भल्या भल्यांना पडली आहे.मुळचा बीड येथील रहिवासी असलेल्या सुहास खाडे याने दहावीपर्यंतचे शिक्षण घेत असताना कला शिक्षक सारंग वाघमारे यांच्या चित्रकलेने प्रभावीत झाला़ या चित्रांनी आणि सारंग वाघमारे यांच्या मार्गदर्शनाने चित्रकलेचा छंद सुहास खाडेला चांगलाच जडला. शाळेत येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला त्यांचे स्केच बनवून भेट देण्याची प्रथाच त्याने सुरू केली. एवढेच नव्हे, तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांना अवघ्या काही क्षणातच त्यांचे चित्र रेखाटून भेट देण्याची प्रथा तो आजही जोपासतो आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. त्याला डॉक्टर बनायचे आहे. विज्ञान शाखेचा अभ्यास करीत तो चित्र रेखाटण्याचा छंदही तेवढ्याच उत्साहाने जोपासत आहे. त्याच्या या कामाचे कौतुकही होत आहे.
सुहास खाडेच्या कुंचल्याची सेलिब्रिटींनाही भुरळ...
By admin | Updated: January 11, 2015 00:56 IST