ेसखाराम शिंदे, गेवराईतालुक्यातील रोहितळ येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. याबाबत गावकऱ्यांनी कोणतेही आक्रमकता न घेता सरळ गुरुवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात मुलांची शाळा भरवून गांधीगिरी केली.गेल्या अनेक महिन्यापासून येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकच दांडी मारत होते. त्यामुळे गावकऱ्यांनी गुरुवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात मुलांची शाळा भरवून दोन तास उलटले तरी प्रमुख अधिकारी नसल्यामुळे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कार्यालयात येऊन गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर कारवाईचे आदेश दिले. या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत ४०० विद्यार्थ्यांची संख्या आहे. तर १५ शिक्षकांचा ताफा या शाळेकरीता आहे. असे असताना देखील केवळ पाच शिक्षकांवरच गेल्या अनेक दिवसांपासून शाळेचा कारभार चालत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. याबाबत गावकऱ्यांनी शिक्षण विभागाला वेळोवेळी पत्राद्वारे कळविले होते. मात्र त्याची दखल येथील मुख्य कार्यालयात अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळेच ेगटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गावकऱ्यांनी शाळा भरविली. गावकऱ्यांची ही गांधीगिरी पाहून तहसीलदार शेळके यांनी लेखी पत्र देऊन गैरहजर राहणाऱ्या शिक्षकावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी मुकुंद बाबर, संतोष, राऊत, हरिभाऊ गायकवाड, हरिभाऊ पवार, बापू गायकवाड, अंगद पांचाळ, कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)
रोहितळच्या गावकऱ्यांची अशीही गांधीगिरी
By admin | Updated: November 28, 2014 01:12 IST