शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुबोध भावे, घोडेस्वारी आणि ‘नवी तयारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:04 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे तसेच तो सोशल मीडियावर ...

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे तसेच तो सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. याशिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. व्हिडिओ तो घोडेस्वारी करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘तयारी’ असे लिहिले आहे. एरव्ही दमदार अभिनयाबरोबर वेगवेगळ्या भूमिकांचा माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सुबोध आता काय नवीन घेऊन येतोय, हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.

ईशा-ऋषीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव

अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता ऋषी सक्सेना रिलेशनशीपमध्ये आहेत. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत. ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. या दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या फॅन्स आवडते. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका साकारली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकाचे मन जिंकले होते. ईशाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर अभिनेता ऋषी सक्सेनासोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोत दोघांची जोडी खूपच क्यूट दिसते. दोघांनी फोटोत ट्रेडिशनल कपडे परिधान केले आहेत. फॅन्सनी दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

व्हाईट आऊटफिटमधील श्रुतीने वेधले लक्ष

अभिनेत्री श्रुती मराठेने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. श्रुती सोशल मीडियावर आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने शेअर करत असते. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. अलीकडेच तिने तिचे ‘व्हाईट ड्रेस’मधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती खूपच सुंदर दिसते आहे. त्यातील सिंपल लूकने श्रुतीच्या सौंदर्याला चार चाँद लावते आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली. सेलिब्रेटींनीही तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.