शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

थरांचा थरार कमी; सुरक्षितता महत्त्वाची

By admin | Updated: August 13, 2014 01:45 IST

औरंगाबाद : १८ वर्षांखालील मुला-मुलींना दहीहंडी फोडण्यासाठी २० फुटांहून जास्त उंचीचे मानवी थर लावण्यास बंदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व दहीहंडी उत्सव मंडळांना द्यावेत, असे आदेश दिले.

औरंगाबाद : उच्च न्यायालयाने सोमवारी १८ वर्षांखालील मुला-मुलींना गोविंदा पथकात सहभागी करून घेण्यास व दहीहंडी फोडण्यासाठी २० फुटांहून जास्त उंचीचे मानवी थर लावण्यास बंदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व दहीहंडी उत्सव मंडळांना द्यावेत, असे आदेश दिले. दहीहंडीत थरांचा थरार कमी होईल; मात्र गोविंदा पथकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे आदेश महत्त्वाचे असल्याचे शहरातील गोविंदा पथकांनी व्यक्त केले.दहीहंडीचा सराव करताना खाली पडून नवी मुंबई व मुंबईत दोन बालगोविंदांच्या झालेल्या मृत्यूची गंभीर दखल घेत हे आदेश देण्यात आले. दहीहंडीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून शहरातील मंडळांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या काही वर्षात शहरातील विविध भागात दहीहंडी महोत्सव अधिक ग्लॅमरस करण्यावर भर असल्याचे दिसून येत असून दहीहंडीत सात थरांसाठी थरार रंगत आहे. दहीहंडी वेळेत आणि सुरक्षितरीत्या पार पाडण्यासाठी दुपारी महोत्सव सुरू केला जातो. गोविंदांचा जीवन विमा उतरविणे, डॉक्टरांचे पथक, रुग्णवाहिका उपलब्ध राहील, तसेच हेल्मेटची सक्ती, सर्वात वरील गोविंदास सांभाळण्यासाठी हूक लावण्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येते. सोमवारी देण्यात आलेल्या आदेशामुळे दहीहंडी उत्सव अधिक सुरक्षितपणे साजरा होईल, असे शहरातील मंडळाच्या सदस्यांनी म्हटले.प्रशिक्षणाअभावी अपघातकोणत्याही प्रशिक्षणाअभावी अनेकांकडून थर रचले जातात. यातूनच अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे गोविंदांना प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. मोठी मंडळे दोन ते तीन महिन्याआधी सराव सुरू करतात. बालगोपालांचा काहीसा हिरमोड होईल, असे जय भोले क्रीडा मंडळाचे मनोज संतान्से म्हणाले.चार थर लागणारदहीहंडी उत्सवात मानवी थर पाहण्यासाठी नागरिक येतात. २० फूट उंचीच्या मर्यादेमुळे चार थर लागतील. त्यामुळे थर पाहण्याचा उत्साह काहीसा कमी होईल.गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हेल्मेटची काळजी घेतली जाते. सुरक्षेच्या दृष्टीने यापुढे अधिक काळजी घेतली जाईल, असे शहरातील दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांनी सांगितले.