औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाच उपकुलसचिवांच्या बदल्या करण्यात आल्या असून, सायंकाळी उशिरा त्यांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश बजावण्यात आले. कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी मागील दोन महिन्यांपूर्वी विद्यापीठातील उपकुलसचिवांची खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी काही उपकुलसचिवांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्फत या बदल्यांवर स्थगिती आणली. दरम्यान, आज केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप झाल्यानंतर सायंकाळी उशिरा कुलगुरूंनी बदलीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर उपकुलसचिव डॉ. धनराज माने यांनी बदलीचे आदेश तात्काळ बजावले. बदली झालेल्यांमध्ये ईश्वर मंझा यांची अकॅडमी आणि स्पेशल सेल, डी. एम. नेटके यांची पदव्युत्तर आणि पीएच.डी.विभाग, डॉ. गणेश मंझा यांची नियोजन व कुलगुरूयांचे सचिवालय, विष्णू कऱ्हाळे यांची परीक्षा विभाग आणि दिलीप भरड यांची आस्थापना विभागात बदली करण्यात आलेली आहे.
उपकुलसचिवांच्या बदल्या
By admin | Updated: December 17, 2014 00:38 IST