औरंगाबाद : कोणी हॉटेल मॅनेजमेंटची माहिती, कोणी इंजिनिअरिंग, मेडिकलची, तर काही जण अॅनिमेशन, आर्किटेक्ट, कंपनी सेक्रेटरीच्या अभ्यासक्रमाची माहिती जाणून घेत होते. प्रत्येक जण करिअरच्या नवनवीन वाटा धुंडाळत होते. अशा विद्यार्थ्यांसाठी लोकमत अस्पायर एज्युकेशन फेअर दिशादर्शक ठरले. आपल्या करिअर निवडीबद्दल विद्यार्थी किती जागरूक आहेत याची प्रचीती यानिमित्ताने आली.करिअरबद्दल आम्ही संभ्रमित झालो असताना लोकमतने योग्य वेळी प्रदर्शन भरवून आम्हाला भविष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या हेच या प्रदर्शनाचे फलित ठरले.८ जून रोजी या तीन दिवसांच्या प्रदर्शनाची सांगता झाली. औरंगाबादकरच नव्हे, तर मराठवाड्यातून विद्यार्थी व पालक या प्रदर्शनात भेट देण्यासाठी आले होते. एसएफएस मैदानावर सकाळी १० वाजेपासूनच पालक व विद्यार्थ्यांची वर्दळ वाढत होती. अनेक जण सहपरिवार या प्रदर्शनस्थळी आले होते. प्रदर्शनात भेट देणाऱ्यांपैकी दहावीची परीक्षा दिलेले तसेच बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. औरंगाबाद, नगर, कोपरगाव, पुणे, हैदराबाद येथील नामांकित शैक्षणिक संस्थांची येथे दालने होती. विविध अभ्यासक्रमांची प्रवेशासह माहिती तज्ज्ञ देत होते. सायंकाळी मोठी गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांसोबत पालकही विविध अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेत होते. तज्ज्ञ शंकांचे निराकरणही करीत होते. पारंपरिक शिक्षणाबरोबरच करिअरचे इतर मार्ग विद्यार्थ्यांना या प्रदर्शनात सहज उपलब्ध झाले. काही विद्यार्थी नियमित पदवी अभ्यासक्रमाबरोबर एकाच वेळी इतर अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतील का, ते पाहत होते. काही जण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत गटा-गटाने अभ्यासक्रमाची बारीकसारीक माहिती जाणून घेत होते. प्रत्येक संस्थेतील तज्ज्ञ उत्साहाने ती देत होते. लोकमतच्या या उपक्रमाला पालकांनी शुभेच्छा दिल्या व प्रदर्शनाचे दिवस आणखी वाढवावेत, अशी मागणी केली.शिक्षण संस्थेचेतज्ज्ञ आनंदितया प्रदर्शनात औरंगाबादशिवाय पुणे, नगर, कोपरगाव, हैदराबाद येथील शैक्षणिक संस्था सहभागी झाल्या होत्या. करिअरसंदर्भात जेव्हा विचार करण्याची अंतिम वेळ असते त्याच योग्य वेळी लोकमतने प्रदर्शन आयोजित केले आणि त्यास मराठवाड्यातून प्रतिसाद मिळाला याबद्दल संस्थेच्या तज्ज्ञ मंडळीने आनंद व्यक्त केला.
करिअर निवडीत पालकांसह विद्यार्थी कमालीचे जागरूक
By admin | Updated: June 9, 2014 01:10 IST