शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

सशक्त, देखण्या कलादर्शनाने भारावले रसिक

By admin | Updated: December 12, 2014 00:56 IST

औरंगाबाद : दृष्टी नसतानाही केलेले नृत्य कमालीचे डोळस होते... मूकबधिर असूनही गातानाचा सूर सच्चा होता आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असूनही केलेला अभिनय मात्र सशक्त होता...

औरंगाबाद : दृष्टी नसतानाही केलेले नृत्य कमालीचे डोळस होते... मूकबधिर असूनही गातानाचा सूर सच्चा होता आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बल असूनही केलेला अभिनय मात्र सशक्त होता... सुदृढ माणसांनाही लाजवेल असा प्रसन्न कलाविष्कार देशभरातील विशेष मुलांनी सादर केला, तेव्हा उपस्थित रसिक अक्षरश: नि:शब्द झाले. साऊथ सेंट्रल कल्चरल झोनतर्फे आयोजित उमंग सांस्कृतिक महोत्सवात देशभरातून आलेल्या विशेष मुलांनी नृत्य, नाट्य आणि गायनाचे उत्स्फूर्त सादरीकरण केले. तापडिया नाट्यमंदिरात होणाऱ्या या तीनदिवसीय महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांनी केले. औरंगाबादच्या उत्कर्ष अपंग प्रशिक्षण केंद्राच्या चमूने ‘मौला मेरे लेले मेरी जान..’ या गाण्यावर पर्यावरण रक्षणाची थीम घेऊन अर्थवाही नृत्य सादर केले. त्यांचे प्रशिक्षक सिद्धार्थ करवाडे यांनी केलेल्या सांकेतिक भाषेतील दिग्दर्शनानुसार या मूक-बधिर मुलांनी केलेला पदन्यास थक्क करणारा होता. परदीप कौर हिने केलेल्या भांगडा नृत्यातील दमदार पदन्यास आणि ऊर्जा ‘वन्स मोअर’ घेऊन गेली. जयपूर येथील नंदकिशोर, आशिष व अंकित यांनी केलेल्या स्केटिंग नृत्याला उत्स्फूर्त वाहवा मिळाली. मुंबईच्या कमला मेहता स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेच्या मुलींनी रोप मल्लखांबावरील योगासन आणि कसरती सादर केल्या. स्वत:च्या शारीरिक मर्यादांवर मात करीत समन्वय आणि आत्मविश्वासाचे त्यांनी घडवलेले दर्शन अंतर्मुख करून गेले. त्यांचे प्रशिक्षक उदय देशपांडे व प्रा. नीता ताटके यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. विलास जानवे यांनी सूत्रसंचालन केले. उद्या महोत्सवात सायंकाळी पाच वाजता ‘भरारी’ हे प्रेरणादायी नाटक सादर होईल.