फुलंब्री : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवार व त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी भाऊगर्दी केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक गावात किमान दोन पॅनल झालेले आहेत. फार्म एकच भरणार, पण त्याच्यासोबत वाॅर्डातील काही व्यक्ती आल्यामुळे तहसील परिसरात मोठी गर्दी झाली होती.
.........................................................................................................
बुधवारी अनेक कार्यालये पडली ओस
फुलंब्री : ग्रामपंचायत निवडणुकीकरिता तालुक्यातील कृषी, शिक्षण, नगरपंचायत, पंचायत समिती या कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याने या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती. अनेक नागरिकांना कामासाठी १५ तारखेनंतर येण्यास अधिकारी, कर्मचारी सांगत आहेत.
..............................................................
फुलंब्री शहरात वाहतूक कोंडी
फुलंब्री : औरंगाबाद -जळगाव महामार्गाच्या दोन्ही बाजूने फुलंब्री शहर वसलेले आहे. या मुख्य मार्गावरून शहरात जाण्याकरिता एकमेव मार्ग हा जुन्या पोलीस ठाण्यापासून आहे, पण या मार्गाच्या तोंडावरच हातगाडे, दुकाने, भाजीपाल्याची दुकाने थाटलेली असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. भाजीपाला विक्रेत्यांना नगरपंचायतकडून जागा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानासुद्धा ते त्या जागेवर न बसता रस्त्यावर बसतात. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.