शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:15 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदरी घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलीस प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदरी घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यानुसार मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. गणपती विसर्जनासाठी मोती तलाव परिसरात पालिकेच्या वतीनेसुद्धा आवश्यक तयारी करण्यात येत आहे.गणेश उत्सव व विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस ठाणे स्तरावर शांतता समिती, ग्रामसुरक्षा दल, पोलीस मित्र व तंटामुक्त समितीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.आतापर्यंत अवैध दारू विक्री करणाºया ७३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच चार लाख ९३ हजार ४७० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. १७ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, दहा जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. गुन्हेगारीसह जातीय तेढ निर्माण करणाºया १०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जालना शहरात दरवर्षी विसर्जन मिरवणूक दहा ते बारा तास चालते. यंदा मंगळवारी होणारी मुख्य विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांना दिल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीच्या अंतिम नियोजनाबाबत शोभाप्रकाश मंगल कार्यालयात पोलीस प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी आढावा घेण्यात येणार आहे.मोती तलाव परिसरात तयारीघाणेवाडी जलाशयात गणेश मूर्ती विसर्जनाला पालिका प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मोती तलावात विसर्जन केले जाणार आहे. घरगुती गणेश विसर्जनासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रिम हौद बांंधण्यात आला आहे. तलाव चौपाटीवर पालिकेच्यावतीने साफसफाई करण्याचे काम रविवारी दिवसभर सुरू होते. या ठिकाणी सर्वत्र दिवे बसविण्यात येणार असून, तलावात लाईफ गार्डसह जीवरक्षक बोटी तैनात करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले.