शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गावगुंडांवर कठोर कारवाई होणार...

By admin | Updated: January 23, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : सन २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे़

उस्मानाबाद : सन २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे़ गुन्ह्यांच्या उलगड्यातही जिल्ह्याचा चांगला आलेख आहे़ कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत़ शहरी- ग्रामीण भागात तणावाचे वातावरण निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या गावगुंडांसह निवडणुकीत कायदा हातात घेणाऱ्या राजकीय गुंडांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी दिली़उस्मानाबाद येथील पोलीस मुख्यालयात सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ पाटील म्हणाले, डिसेंबर १६ अखेरपर्यंत दाखल खुनाच्या ४४ घटनांपैकी ३८ प्रकरणांचा उलगडा झाला असून, याचे प्रमाण ८६ टक्के आहे़ तर गतवर्षीच्या उलगड्याच्या प्रमाणात पाच टक्क्यांनी यात वाढ झाली आहे़ सदोष मनुष्यवधाच्या दाखल दोन्हीही प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ खुनाच्या प्रयत्नाच्याही सर्वच्या सर्व प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ या घटनांमध्ये दोनने घट झाली आहे़ दरोड्याच्या घटनांमध्येही चांगली घट झाली असून, दाखल सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ चोरी, जबरी, चोरी, घरफोड्या, इतर चोऱ्यांच्या घटनांमध्येही यंदा घट झाली आहे़ असे असले तरी या घटना उलगडा होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही़ इतर प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण हे २०१५ पेक्षा २०१६ मध्ये चांगले दिसून येत आहे़ २०१५ मध्ये ३७९५ जणांविरूध्द विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती़ तर २०१६ मध्ये यात मोठी वाढ झाली असून, ५७९० जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ शिवाय अवैध धंद्यांविरूध्दही कारवाईत मोठी वाढ झाली आहे़ दोष सिध्दतेत १८ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली असून, यात आठ खुनाच्या घटनांचा समावेश असल्याचेही पाटील यांनी सांगितले़ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही प्रशासन प्रयत्न करीत आहे़ निवासस्थाने, पोलीस ठाण्याच्या नवीन इमारती, वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठीही शासनदरबारी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी)