शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतर रोखा, रोहयोची कामे वाढवा...!

By admin | Updated: November 24, 2014 00:36 IST

बीड : नूतन सीईओ नामदेव ननावरे यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही बैठक, विभागांची पाहणी व गावभेटी करत प्रत्यक्ष कामकाजाचा श्रीगणेशा केला.

बीड : नूतन सीईओ नामदेव ननावरे यांनी रविवारी सुटीच्या दिवशीही बैठक, विभागांची पाहणी व गावभेटी करत प्रत्यक्ष कामकाजाचा श्रीगणेशा केला. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखून गावातच रोहयोची कामे उपलब्ध करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या सभागृहात रविवारी सकाळी झालेल्या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) आर. आर. भारती, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे, नरेगाचे गटविकास अधिकारी एम. जे. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या सुरुवातीला सर्व अधिकाऱ्यांशी परिचय करुन घेतला. त्यानंतर सीईओ ननावरे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी ननावरे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पाणी, चारा, धान्य याची टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. मात्र, दुष्काळी पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करुन सामान्यांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. रोहयोची कामे तत्काळ उपलब्ध करुन द्या, मजुरांचे स्थलांतर रोखा; परंतु हे करताना बोगसगिरीला थारा देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्यालय सोडू नका, सोडण्यापूर्वी वरिष्ठांना कळवा, असे फर्मानही त्यांनी अधिकाऱ्यांना सोडले. आर. आर. भारती यांचेही मार्गदर्शन झाले. यावेळी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. पौंडूळला भेटशिरुर तालुक्यातील पौंडूळ येथील ग्रामपंचायतीला सीईओ नामदेव ननावरे यांनी भेट दिली. यावेळी संग्राम कक्षात कागदपत्रांच्या योग्य त्या नोंदी व्हाव्यात. तेथून सर्व प्रमाणपत्रे उपलब्ध व्हावेत, असे त्यांनी सांगितले.शिवाय घर तिथे स्वच्छतागृह बांधलेच पाहिजे. सदृढ आरोग्यासाठी शौचालय बांधून घ्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. एम. ढोकणे, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)