शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यापासून आरोग्य उपकेंद्र बंद

By admin | Updated: August 14, 2014 01:55 IST

सुरंगळी : भोकरदन तालुक्यातील केंद्रअंतर्गत सुरंगळी, जळगाव सपकाळ येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने उपचाराअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

सुरंगळी : भोकरदन तालुक्यातील केंद्रअंतर्गत सुरंगळी, जळगाव सपकाळ येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने उपचाराअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रिक्तपदांसह इतर समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात अन्यथा या केंद्रला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.ग्रामीण भागातील जनतेला चांगला उपचार मिळावा यासाठी लाखो रूपये खर्च करून आरोग्य विभागाने अनेक ठिकाणी उपकेंद्रे सुरू केली. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी ही उपकेंद्रे नेहमीच बंद असल्याने त्या निव्वळ शोभेची वस्तू म्हणून उभ्या आहेत. हे उपकेंद्र बांधून अनेक वर्ष झाली. तरी अद्यापही येथे पूर्णवेळ असा एकही वैद्यकीय अधिकारी अथवा परिचारिका येथे हजर नसतात. याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु अद्यापही केंदे्र गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत.परिसरातील ग्रामस्थ रात्रीबेरात्री कोणी जरी गंभीर आजारी पडल्यास प्राथमिक उपचार करण्यासाठी उपकेद्रात कोणीच कर्र्मचारी नसल्याने तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. अनेक वेळा असे प्रसंग नागरीकावर आले आहे. ग्रामस्थामंध्ये रोष आहे. येथील कर्मचाऱ्यांची तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी ग्रामपंचात सदस्य काशीनाथ दांडगे, शेख एजाज, सुदाम काळे, माजी उपसरपंच संजय जाधव आदींनी केली आहे. अन्यथा उपकेंद्राला कूलूप लावण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. (वार्ताहर)