औरंगाबाद : मीटर सक्तीसह रिक्षाचालकांविषयी घेण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीतर्फे २१ ते २३ मार्चदरम्यान बंद पुकारण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत बंद करण्याचा इशारा समितीने दिला आहे. शहर बसेसची अपुरी संख्या पाहता हजारो प्रवाशांना या बंदचा फटका सहन करावा लागणार आहे.तीनदिवसीय बंदच्या तयारीसाठी रविवारी औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने विविध रिक्षाचालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आजपासून तीन दिवस रिक्षा बंद
By admin | Updated: March 20, 2016 23:57 IST