शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्टोन क्रेशरचालकांनी तोडले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:39 IST

नांदेड: स्टोन के्रशर चालकाकडे असलेल्या थकित वसुलीबाबत तहसील कार्यालयाने गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करताच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: स्टोन के्रशर चालकाकडे असलेल्या थकित वसुलीबाबत तहसील कार्यालयाने गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करताच, त्यामुळे संबंधित स्टोन क्रेशरधारकाने बंधपत्र लिहून देत तहसील कार्यालयाकडे पंधरा लाख रुपयांचा भरणा केला़ नांदेड तहसील कार्यालयाअंतर्गत १६ स्टोनक्रेशर आहेत़ त्यापैकी ६ स्टोन क्रेशरचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे़ त्यापैकी दोन क्रेशर हे कायमस्वरुपी बंद असून आठ स्टोन क्रेशरधारकांकडे वसुली प्रलंबित आहे़ हे स्टोनक्रेशर २०१३ पासून बंद असून २०१६ मध्ये प्रलंबित वसुलीमुळे महसूल कार्यालयाने क्रेशरला सील ठोकले होते़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या आदेशानंतर या प्रकरणात उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी बाभूळगाव व गुंडेगाव परिसरातील स्टोन क्रेशरची पाहणी केली़ त्यावेळी स्टोनक्रेशर चालकाने महसूलने लावलेले सील तोडून क्रेशर सुरु केल्याची बाब समोर आली़ त्यामुळे या स्टोन क्रेशरचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची तयारी मंडळ अधिकारी वसरणी व तुप्पा यांनी केली होती़त्याचवेळी के्रशरचालकांनी प्रलंबित वसुली भरण्यास सहमती दर्शविली़ जे़ आऱ स्टोन क्रेशर गट क्रमांक २३० मौजे तुप्पा यांच्याकडे ११ लाख ६५ हजार ६३४ रुपये, माऊली स्टोनक्रेशर गट क्रमांक १६३ बाभूळगावकडे १२ लाख ३६ हजार, फ्रेन्डस स्टोनक्रेशर गट क्रमांक ३५० काकांडी- १६ लाख १३ हजार ३३३, गिरीराज स्टोनक्रेशर गट क्रमांक १९४ बाभूळगांव-२६ लाख ६० हजार ६६७, उज्वल स्टोनके्रशर गट क्रमांक ९८ बाभूळगाव यांच्याकडे २ लाख ६ हजार रुपयांची थकबाकी होती़ या स्टोनक्रेशरधारकांकडे थकबाकी असताना त्यांनी सील तोडून पुन्हा क्रेशर सुरु केले होते़ याबाबत तहसील कार्यालयाला त्यांनी बंधपत्र लिहून दिले असून प्रत्येकी ३ लाख ६ हजार रुपयांचा धनादेश दिला आहे़ त्यामुळे प्रलंबित वसुलीपैकी १५ लाखांची वसुली झाली आहे़