शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ४९ तलवारींसह धारदार शस्त्रांचा साठा जप्त ; आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ऑनलाइन मागविलेल्या ४९ धारदार कुकरी, बाहुबली तलवारींचा साठा बायजीपुरा परिसरातून पुंडलिकनगर आणि जिन्सी पोलिसांनी रविवारी सकाळी जप्त ...

औरंगाबाद : ऑनलाइन मागविलेल्या ४९ धारदार कुकरी, बाहुबली तलवारींचा साठा बायजीपुरा परिसरातून पुंडलिकनगर आणि जिन्सी पोलिसांनी रविवारी सकाळी जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी इरफान खान आयुब खान ऊर्फ दानिश याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून तलवार विकणारे तसेच पुरवठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी सांगितले.

इरफान खान सुरुवातीला तलवारी ऑनलाइन मागवून त्या लग्न व इतर कार्यक्रमात भाडेतत्वावर देत होता. त्याने तो विक्रीचा व्यवसाय सुरू केला, आणि त्यातून चांगला नफा होत असल्यामुळे त्याने मोठी ऑर्डर कुरिअर कंपनीला दिली. त्याने कुरिअरने मागविलेला शस्त्रसाठा विक्रीसाठी मागविला की अन्य कारणांसाठी याचा तपास पोलीस करीत आहेत. त्याच्यासोबत अजून कोण सहभागी आहेत का या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शस्त्रसाठा मागविण्यात आला का, या प्रश्नावर उपायुक्त गिर्हे म्हणाले की, सध्या इरफानची सखोल चौकशी सुरू असून, कुरिअरच्या माध्यमातून ऑनलाइन मागविलेला शस्त्रसाठा त्याच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. कुरिअर कंपनीच्या ज्या वाहनातून शस्त्र मागविले ते वाहन पुंडलिक नगर पोलिसांनी जप्त केेले आहे. बायजीपुरा परिसरातील त्याच्या घरातून ४९ तलवारी व इतर अन्य शस्त्र जप्त केले आहे. शस्त्र पाठविणाऱ्यांसह खरेदी करणाऱ्यांपर्यंत सर्वांची चौकशी केली जाणार आहे, असे उपायुक्त गिर्हे यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे उपस्थित होते.

विशेष शाखेच्या पथकाचीही मदत

पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, शेख सरवर, दत्ता शेळके, सहायक फौजदार अयुब पठाण, संपत राठोड, हारुण शेख, भाऊसाहेब जगताप, गनी शेख, बाळू थाेरात, सुनील जाधव , संजय गावडे, इरफान खान, बाळाराम चौरे, अजय कांबळे, दीपक जाधव, मांटे, प्रवीण गुळे, रवी जाधव, रमेश सांगळे या विशेष शाखेच्या पथकानेही कारवाईत सहभाग घेतला.

या शस्त्र साठ्याचा समावेश

पोलिसांनी कारवाईत ३६ तलवारी, ६ कुकरी , २ गुप्ती , ५ बाहुबली तलवारींचा शस्त्र साठा जप्त केला आहे.