शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षात अवघ्या ३० पुरुषांची नसबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST

फुलब्री : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात बारा हजार महिलांवर कुटुंब नियोजनावर शास्त्रक्रिया झाल्या. त्या तुलनेत पुरुषाच्या नसबंदीचे प्रमाण ...

फुलब्री : औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात बारा हजार महिलांवर कुटुंब नियोजनावर शास्त्रक्रिया झाल्या. त्या तुलनेत पुरुषाच्या नसबंदीचे प्रमाण नगण्य असून केवळ ३० पुरुषांनीच नसबंदी केल्याची आकडेवारी पुढे आली आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे ही शस्त्रक्रिया महिलांवरच अधिक होत असल्याचे चित्र आहे. याबाबत समाजात गैरसमज असल्याने पुरुष मंडळी यापासून दूरच राहत महिलांना पुढे करत असल्याचे दिसून येते.

कुटुंब नियोजनाचा विचार करता घरात महिलांना शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाते. गेल्या दोन वर्षातील कुटुंब नियोजनाचा आकडेवारी पाहता १२ हजार ५० शस्त्रक्रिया झाल्या. यात १२ हजार २० महिला तर अवघ्या ३० पुरुषांवर शस्त्रिक्रया झाली असल्याचे माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. २०१९ मध्ये जिल्ह्यात एकूण १० हजार ५०३ शस्त्रक्रिया झाल्या असून यात १० हजार ४७८ महिला तर २५ पुरुषाचा समावेश होता. यासह २०२० मध्ये एकूण १ हजार ५८४ शस्त्रिक्रेयत १ हजार ५८० महिला तर अवघ्या पाच पुरुष आहे.

------ गैरसमज असल्याचे अडचणी ----------

आजही पुरुष प्रधान संस्कृतीचा गाजावाजा असल्याने महिलांच्या सर्वाधिक शस्रक्रिया केल्या जातात. शस्रक्रियेनंतर कमजोरी येते असा गैरसमज पुरुषात असल्याने अनेक अडचणींचा बाहू केले जातो. पुरुष कमवता व कर्ता असल्याने महिलेनेच शस्त्रक्रिया करावी असे समजात रुढ आहे. त्यामुळेच महिलांच्या तुलनेत पुरुषावर शस्रक्रिया कमी होतात. परंतु आता आशा, आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत जनजागृती व आरोग्य शिक्षणावर भर दिला जात आहे. डॉ. सतीश साबळे, वैद्यकीय अधिकारी

--------------- मी नसबंदी करून दोन वर्ष झाले आहे. मला कोणताही त्रास आजपर्यंत झालेला नाही. माझी शक्ती सुद्धा कमी झालेली नाही हे विशेष. यासह पुरुषाप्रमाण मी सर्व काही कामे करू शकत असून शारीरिकदृष्ट्या पण पूर्णपणे सुद्रुढ असल्याचे मत वारेगावातील नसबंदी केलेल्या एका पुरुषाने सांगितले.

------------

नसबंदी केल्याने माणसामधील पुरुषत्व नष्ट होते असा गैरसमज असून तो माझ्यातही होता. पण मी धाडस करून नसबंदी केली. या नसबंदीनंतर नियमित पणे पुरुषाला हवे ते कामकाज करता येत असल्याचे पुढे आहे. यादरम्यान शारीरिक शक्तीवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे पुरुष नसबंदीबाबत गैरसमज दूर झाल्याचे मत रेलगाव येथील नसबंदी केलेल्या इसमाने स्पष्ट केले.

---------- औरंगाबाद जिल्ह्यात दोन वर्षातील कुटुंब नियोजन विषयी आकडेवारी

२०१९ मध्ये -- एकूण शास्राक्रिया १०५०३ -- महिला १०४७८ -- पुरुष -- २५ --

२०२० मध्ये -- एकूण -- १५८४ -- महिला -- १५८० -- पुरुष -- ५ --