शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

लाईट गुल झाल्याने एसटीची सेवा ठप्प

By admin | Updated: November 16, 2014 00:38 IST

औरंगाबाद : महावितरणने करार रद्द केल्याने संतापलेल्या जीटीएलने शुक्रवारी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करून शहरवासीयांना वेठीस धरले. अनेक भागांतील वीजपुरवठा शनिवारीही खंडितच होता.

औरंगाबाद : महावितरणने करार रद्द केल्याने संतापलेल्या जीटीएलने शुक्रवारी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करून शहरवासीयांना वेठीस धरले. अनेक भागांतील वीजपुरवठा शनिवारीही खंडितच होता. त्यातच वीजपुरवठ्याअभावी राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बससह विविध मार्गांवरील बससेवा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.महामंडळातर्फे बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे तिकीट देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये प्रवासाचा मार्ग, जमा झालेली रक्कम आदी माहिती संगणकाद्वारे घेतली जाते. विविध मार्गांवर बस रवाना करण्याआधी ही माहिती घेतली जाते.शुक्रवारी दुपारनंतर सिडको बसस्थानकाचा वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय शनिवारी सकाळी ८ वाजेनंतर येथील इन्व्हर्टर बंद पडले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये प्रवासाचा मार्ग टाकणे, जमा झालेली रक्कम याची माहिती घेण्यास, चार्जिंग आदींमध्ये अडचण निर्माण झाली. दुपारपर्यंत सकाळच्या सत्रातील रोकड जमा झालेली नव्हती. प्रवासाचा मार्ग न मिळाल्याने दुपारपर्यंत शहर बसेससह विविध मार्गांवरील बसेस आगारातच उभ्या होत्या.तिकीट मशीन मिळविण्यासाठी वाहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागली, अशा परिस्थितीमुळे शहर बसेसचे वेळापत्रकच कोलमडले. यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत शहर बसेस न धावल्याने विद्यार्थ्यांची आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली, अशा परिस्थितीत बॅटरींद्वारे कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटरद्वारे येथील कामकाज सुरळीत ठेवण्यात आले होते.२० शहर बसेस उभ्या सिडको बसस्थानकाच्या आवारात दुपारी जवळपास २० शहर बसेस उभ्या राहिल्या होत्या. यामध्ये औरंगपुरा, बजाजनगर, रांजणगावसह विविध मार्गांवरील बसेसचा समावेश होता. यामुळे या मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय झाली.सेवा देण्याचा प्रयत्नवीजपुरवठ्याअभावी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय, प्रवाशांचीही गैरसोय झाली; परंतु अशा परिस्थितीतही प्रवासी देण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्थानक प्रमुख आर.बी. राजपूत यांनी सांगितले.