शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील स्टील उद्योगाला उभारी येणार...!

By admin | Updated: March 20, 2016 00:43 IST

राजेश भिसे , जालना गत चार वर्षांपासून दुष्काळाचा परिणाम जालन्यातील औद्योगिक वसाहतीलाही सहन करावा लागत असून, जास्तीच्या वीजदरामुळे हा उद्योग अडचणीत सापडला होता

राजेश भिसे , जालना गत चार वर्षांपासून दुष्काळाचा परिणाम जालन्यातील औद्योगिक वसाहतीलाही सहन करावा लागत असून, जास्तीच्या वीजदरामुळे हा उद्योग अडचणीत सापडला होता. शुक्रवारी विधानसभेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात स्टिल उद्योग जगतातील वीज दरात सूट देण्याची मागणी मान्य झाल्याने महिन्याला दहा कोटी रुपये वाचणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. परिणामी स्टिलचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. गत काही वर्षांत स्टिल उद्योगाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भरारी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्राद्वारे सळईची निर्मिती केली जात आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत औद्योगिक वसाहतीत ५० छोट्या मोठ्या कंपन्या सुरू होत्या. मंदीचे वातावरण आणि अधिकच्या वीजदरामुळे हा उद्योग अडचणीत सापडला होता. सद्यस्थितीत १४ मोठे प्रकल्प सुरू आहेत. तर उर्वरित छोट्या मोठ्या कंपन्यांची अवस्था बिकट आहे. काही महिन्यांपूर्वी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वीजदरात सूट देण्याची मागणी केली होती. तसेच जानेवारीत मुख्यमंत्री जालन्यात आले होते. तेव्हा त्यांनी उद्योजकांची परिषद घेतली होती. त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. आगामी अर्थसंकल्पातून दिलासा देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी या परिषदेत दिले होते. त्यानुसार आगामी अर्थसंकल्पात या उद्योजकांची मागणी पूर्ण करण्यात आली. याद्वारे स्टिल उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वीजदरात १ रुपयाची सूट देण्यात आल्यास महिन्याला या उद्योग जगताचे १० कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे स्टिल उद्योगाला उभारी मिळणार असून, स्टिलचे दरही कमी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मंदीची काजळी दूर होणार असून, रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहे. एकूणच मंदीच्या गर्तेत अडकलेल्या या स्टिल उद्योगाला उभारी देण्याचे काम या अर्थसंकल्पातून झाले आहे.