शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या घरी नातवाकडून लातुरात चोरी

By admin | Updated: February 5, 2017 23:18 IST

लातूर : आजीच्या घरी नातवाने चोरी करून १८ तोळे सोन्याचे दागिने पळविले.

लातूर : औसा रोडवरील इंजिनिअरिंग कॉलनीतील एका आजीच्या घरी नातवाने चोरी करून १८ तोळे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना १८ आॅक्टोबर २०१६ रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छडा लावला असून, एका सज्ञान आरोपीसह अन्य दोघा अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर अन्य दोघांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा छडा फेसबुकवरील मेसेजवरून लागला. औसा रोडवरील इंजिनिअरिंग कॉलनी परिसरात राहणाऱ्या भिवाजी एकनाथराव कावळे यांच्या घरातून तब्बल १८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना आॅक्टोबर २०१६ मध्ये घडली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भिवाजी कावळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर दीपक दत्तात्रेय औताडे याच्यावर संशय आल्यामुळे पोलीस व नातेवाईकांनी लक्ष ठेवले. दरम्यान, तो करीत असलेल्या खर्चाच्या रकमेवरून पोलिसांचा संशय अधिक बळावला. दीपक आणि त्याच्या अन्य दोन मित्रांनी हे दागिने एका सराफाकडे विक्री केल्याचे पुढे आले. त्यातून हाती आलेल्या पैशातून त्याने ठिकठिकाणी भटकंती केली. दरम्यान, गोवा येथे गेल्यानंतर तेथे काढलेले सेल्फी फोटो त्याने आपल्या फेसबुकच्या अकाऊंटवर एकमेकांना शेअर केले. पोलिसांनी नातवाचे फेसबुक अकाऊंट चेक केले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याने आजीच्या घरातील सोने चोरल्याचे कबूल केले. त्यातूनच आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो असल्याचे म्हटले आहे. अन्य दोघा अल्पवयीन मित्रांचीही नावे दीपकने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शिवाजीनगर पोलिसांनी दीपक औताडेला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य दोघा अल्पवयीन आरोपींची बालसुधारगृहात रवानगी केली आहे.