शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात टाळण्यासाठी ‘एसटीचा’नवीन उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:28 IST

एसटी वाहक -चालकांच्या आरोग्य दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी आता महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना सोयी-सुविधां पुरविण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : एसटी वाहक -चालकांच्या आरोग्य दृष्टीने व अपघात टाळण्यासाठी आता महाराष्टÑ राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना सोयी-सुविधां पुरविण्याच्या सूचना महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.ग्रामीण भागात रात्रवस्तीसाठी जाणाºया बस चालक - वाहकांच्या राहण्याची पिण्याच्या पाण्याची, स्वच्छता गृहाची सुविधा नाही. तशा तक्रारीही मध्यवर्ती कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. सदर सोयीसुविधा बºयाच ठिकाणी उपलब्ध नसल्याने चालक-वाहकांना पुरेशा आराम मिळत नाही. परिणामी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे महाव्यवस्थापक(वाहतूक) यांनी विभाग नियंत्रक रा. प. औरंगाबाद ,बीड, जालणा, लातुर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे,भंडारा,चंद्रपूर नागपूर, वर्धा, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, धुळे, नाशिक, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ यांना परिपत्रकानुसार सुचना दिल्या आहेत. परिपत्रकात म्हटले की, विभागातील आगार व्यवस्थापकांनी रात्रवस्तीसाठी बसेस जात असलेल्या संबंधित गावांना भेटी द्याव्यात. तसेच गावातील सरपंच यांच्याशी पत्रव्यवहार करून व विभाग नियंत्रकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी पत्रव्यवहार करावा. शिवाय समक्ष भेटी घेऊन रात्रवस्तीसाठी जाणाºया बसेसच्या चालक वाहकांना राहण्यासाठी तसेच त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, व स्वच्छतागृहाची आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल आहेत. शिवाय याबाबत केलेल्या कार्यवाहिची माहिती मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे.