शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

स्टेशनरी बाजारात लगीनघाई!

By admin | Updated: May 24, 2014 01:38 IST

जालना : शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास आणखी २५ दिवसांचा अवधी शिल्लक असला तरीही शालेय साहित्यांची विक्री करण्यासाठी

जालना : शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास आणखी २५ दिवसांचा अवधी शिल्लक असला तरीही शालेय साहित्यांची विक्री करण्यासाठी विविध दुकानदारांसह ग्रामीण भागातील छोटे-मोठे विक्रेते तयारीला लागले आहेत. स्टेशनरी, वह्या, पुस्तके, शालेय साहित्य, वॉटर बॅग आदी साहित्य होलसेल भावात खरेदी करून साठविण्यासाठी रिटेल व्यापार्‍यांनी होलसेल दुकानांमधून गर्दी केल्याचे चित्र आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळा जुन महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. मराठी माध्यमांच्या शाळा १६ जुननंतर सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्यास आणखी दोन-तीन आठवडे अवधी असला तरीही वेळ असला तरीही शालेय साहित्याच्या बाजारपेठेत खरेदी-विक्रीला मोठा वेग आला आहे. होलसेल, किरकोळ विक्रेत्यांची लगीनघाई सुरू आहे. शालांत परिक्षा संपल्या. पाठोपाठ पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षाही अटोपल्या. १ मे रोजी सर्व शाळांचे निकाल जाहीर झाले. तेव्हापासून शाळांना सुट्या होत्या. त्यामुळेच शालेय साहित्यांची बाजारपेठ थंड झाली होती. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर व अन्य शालेय साहित्य खरेदी करावे लागते. परिणामी पुढील महिन्यात ऐन गर्दीच्या वेळी कोणत्याही साहित्याची कमतरता जाणवू नये, याची काळजी व्यापारी घेत आहेत. त्यासाठी होलसेल विक्रेते उत्पादक कंपन्यांकडे मालाची मागणी नोंदवित आहेत. काही व्यापारी कंपन्यांकडून आलेल्या मालाचे दर ठरविणे, किरकोळ विक्रेत्यांकडून आलेल्या मागणीप्रमाणे पुरवठा करीत आहेत. त्याचप्रमाणे शहरासह ग्रामीण भागातील व्यापारीही प्रत्येक मालाची गरज, विक्रीचा अंदाज घेत मागणी नोंदवित आहेत. तसेच विक्रीदर ठरविणे, वह्या, दप्तर आदी साहित्य आकर्षकपणे सजविण्याच्या कामात आहेत. वह्या खरेदी ब्रँडेड कंपन्यांच्या वह्या, रजिस्टर बाजारात दाखल झाले आहेत. यासंदर्भात एका वही विक्रेत्याने सांगितले की, वह्या-पुस्तकांच्या विक्रीत ६ कोटींपेक्षा अधिक उलाढाल होते. प्रत्येक विद्यार्थ्याना कमीत कमी एक डझन वह्या खरेदी कराव्याच लागतात. राज्य शासनाच्या वतीने अभ्यासक्रमांची पुस्तके मोफत दिली जातात, पण खाजगी शाळा, खाजगी प्रकाशकांची पुस्तके आणण्यास सांगत असल्याने खाजगी प्रकाशकांनी तयार केलेली अभ्यासक्रमांची पुस्तकेही दाखल झाली आहेत. नवा गणवेश पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यानी गणवेश घालून शाळेत यावे, असा शालेय व्यवस्थापनाचा निर्णय असतो. यामुळे पालकही आपल्या पाल्यांना शाळा सुरू होण्याआधीच नवीन गणवेश खरेदी करतात. ‘नवा वर्ग नवा गणवेश’ या उक्तीप्रमाणे गणवेश खरेदी केला जातो. व्यापार्‍यांनी सांगितले की, इंग्रजीच नव्हे तर मराठी माध्यमांच्या काही शाळांनी थेट व्यापार्‍यांनाच गणवेशाच्या आॅर्डर देऊन वेगवेगळया साईजमध्ये गणवेश तयार करून मागविले आहेत. काही शाळा यास अपवाद असून त्यांनी पालकांना कुठुनही गणवेश खरेदी करण्याचे स्वातंत्र दिले आहे. गणवेश विक्रीत किमान ३ ते चार कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. दरम्यान, लहान मुलांना आवडतील अशा भडक रंगांच्या, कार्टुन्सचे कव्हर असलेल्या वह्या, दप्तर, वॉटर बॅग, कंपास उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या साहित्यालाही मोठी मागणी राहील, अशी अपेक्षा या विक्रेत्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. (प्रतिनिधी)शालेय साहित्यांप्रमाणे विविध रंग, आकाराच्या छत्र्याही बाजारात दाखल होत आहेत. लहानमुलांना सहज उघडता येतील यासाठी अ‍ॅटोमॅटीक, सप्तरंगी, वजनाने हलक्या, आकर्षक डिझाईन्सच्या छत्र्याही बाजारात दाखल होत आहेत. काही विक्रेत्यांकडे कार्टुन्सच्या छत्र्याही उपलब्ध आहेत.अनेकांच्या दुकानात शालेय साहित्य दाखल झाले असून, दुकानदार आलेल्या साहित्य आकर्षकपणे मांडणी करण्यात दंग आहेत. शालेय सहित्याच्या विक्रीत जुन महिन्यात सुमारे २० कोटींची उलाढाल होईल असा अंदाज व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे.