शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

निधीसाठी राज्य शिखर बँक अनुकूल

By admin | Updated: July 14, 2017 00:16 IST

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिखर बँकेकडे कर्ज स्वरुपात निधीची मागणी केली असून हा निधी देण्यास शिखर बँकेने अनुकूलता दर्शविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिखर बँकेकडे कर्ज स्वरुपात निधीची मागणी केली असून हा निधी देण्यास शिखर बँकेने अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तातडीच्या कर्ज वाटपाचा प्रश्न निकाली निघाला आहे. शेतकऱ्यांनी तातडीच्या कर्जासाठी सेवा सोसायट्यांकडे कर्ज मागणी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी लक्षात घेऊन राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या दरम्यान पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले आहे. दरम्यान, कर्ज माफीच्या घोषणेबरोबरच १४ जुलै रोजी राज्य शासनाने एक अद्यादेश काढून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी बँकांमधून दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. थकबाकीदार शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने शासनाच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना तातडीचे दहा हजार रुपये देणे शक्य होणार नाही. त्यामुळे परभणी जिल्हा बँकेला शेतकऱ्यांच्या कर्जासाठी निधीचा पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेने, राज्य शिखर सहकारी बँकेकडे एका पत्राद्वारे केली होती. ही मागणी करताना शासनाच्या कर्ज माफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांचा अंदाजीत आकडा आणि त्यांना देण्यासाठी लागणारी रक्कम देखील जिल्हा बँकेने शिखर बँकेला कळविली होती. परंतु, हा निर्णय प्रलंबित होता. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना १० हजार रुपयांप्रमाणे तातडीची मदत देण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात आतापर्यंत बँकेमार्फत ही मदत दिली गेली नव्हती. गुरुवारी राज्य शिखर बँकेने जिल्हा बँकेचा प्रस्ताव तत्वत: मंजूर करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेमार्फत आता शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे. तातडीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीकडे मागणी अर्ज जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम खरटमल, जिल्हा बँकेचे सीईओ जाधव यांनी केले आहे.