करमाड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमध्ये शनिवारपासून दि. १७ जुलै रोजी टोमॅटो खरेदीस प्रारंभ करण्यात आला आहे.
पंचक्रोशीतील व औरंगाबाद तालुक्यातील नागरिकांसाठी करमाड येथील खरेदी केंद्र अत्यंत सोयीचे ठरणार आहे. पहिल्या दिवशी उचलती येथील शेतकरी भगवान डोक यांच्या टोमॅटोला प्रति कॅरेट ३११ चा भाव मिळाला.
करमाड येथील बाजार समितीच्या इमारतीत दोन वर्षांपासून या हंगामात टोमॅटो खरेदी सुरू करण्यात येते. टोमॅटोचा खरा हंगाम हा एक ऑगस्टपासून सुरू होईल, त्यावेळी रोज जवळपास ५ हजार कॅरेट टोमॅटोची आवक होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत टोमॅटोची लागवडीत वाढ झाली आहे. यावेळी व्यापारी इलियास बेग, कैलास राजपूत, विष्णू कुबेर, रामेश महेर, रफिक शेट, भरत सोनवणे यांच्यासह करमाळा येथील बाजार समितीचे कर्मचारी गजानन काथार व शेतकरी उपस्थित होते.