शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीच्या ‘त्या’ सदस्यांवर टांगती तलवार !

By admin | Updated: January 17, 2017 00:29 IST

लातूर : न्यायालयाचा आदेश डावलून आरक्षित जागेवरील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचे वाटप केल्याप्रकरणी तत्कालीन स्थायी समितीच्या सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे

लातूर : न्यायालयाचा आदेश डावलून आरक्षित जागेवरील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचे वाटप केल्याप्रकरणी तत्कालीन स्थायी समितीच्या सदस्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार गाळे वाटप केल्याचा ठराव रद्द झाला असला, तरी तक्रारकर्त्यांच्या मागणीनुसार नगरसेवक सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे. गांधी मैदान येथील जागा बालोद्यान आणि सांस्कृतिक सभागृहासाठी आरक्षित होती. या आरक्षित जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले गेले. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका ग्राह्य धरून शॉपिंग कॉम्प्लेक्स पाडण्याचे आदेश मनपाला दिले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाच्या विरुद्ध मनपाने अपिलही दाखल केले. तर दुसरीकडे स्थायी समितीने प्रकरण न्यायप्रविष्ट असताना शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचे वाटप करण्याचा ठराव घेतला होता. या ठरावाच्या विरुद्ध शासनाकडे तक्रार करण्यात आली. मनपा आयुक्तांनीही ठराव रद्द करण्याचे पत्र शासनाला पाठवून दिले. तथापि, ठराव बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन स्थायी समितीचा हा ठराव शासनाकडून रद्द करण्यात आला. याचिकाकर्त्यांनी शासनाकडे केलेली पहिली मागणी मान्य झाली असून, आता दुसरी मागणी तत्कालीन स्थायी समितीतील ‘त्या’ १६ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची आहे. ती मागणी तीन महिन्यांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे. शासन तत्कालीन स्थायी समितीतील ‘त्या’ १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करते, की अपिल करण्यास संधी देते, याकडे मनपाचे लक्ष असून, मनपाच्या राजकीय वर्तुळातही याबाबत चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)