शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पाऊस

By admin | Updated: September 1, 2014 00:28 IST

हिंगोली : संपूर्ण मघात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर पूर्वा नक्षत्राची सुरूवातच जोरदार पावसाने झाली.

हिंगोली : संपूर्ण मघात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर पूर्वा नक्षत्राची सुरूवातच जोरदार पावसाने झाली. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसात रविवारी सायंकाळपर्यंत खंड पडला नव्हता. अधूनमधून पावसाचा जोर चांगलाच वाढत राहिल्याने जिल्ह्याच्या सरासरीने ३०० मिमीचा टप्पा ओलांडला. विशेषत: संपूर्ण मघा नक्षत्रात १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पूर्वाच्या पहिल्याच दिवशी ३७ मिमी पाऊस पडला.मागील पंधरा दिवसांपासून पावसात सातत्य होते. ३० आॅगस्ट रोजी सुरूवात झालेल्या पूर्वा नक्षत्रातही पावसाची गरज होती. दुसरीकडे पोळ्यापासून पाऊस कमी-कमी होत जाण्याची भीती होती. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. रात्री तापमानात घट होताच जोरदार पावसास सुरूवात झाली. सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या पावसात सायंकाळपर्यंत खंड पडला नव्हता. दरम्यान जोरदार वृष्टी होत राहिली. आदल्या रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने कोरड्या जमिनीची तहान भागली. खडकाळ जमिनीच्या बाहेर पाणी निघाले. जिल्ह्यातील बहुतांश ओढे, नाले वाहते झाले. बंधारे, शेततळे, बांध तुडुंब भरले. सर्वत्र मातीमिश्रीत पाणी साचले. आता हळूहळू पाणीपातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. पुढील आठवड्यात पाऊस सुरूच राहिला तर विहिरी काठोकाठ भरण्याची शक्यता आहे. अद्याप हिंगोली तालुक्यात इतर तालुक्यांच्या मानाने कमी पाऊस आहे. सुरूवातीपासूनच पाऊस कमी असताना शनिवारी २० मिमीची नोंद झाली. सर्व तालुके ३०० मिमीच्या जवळ पोहोचले असताना हिंगोलीने २०० मिमीचीही सरासरी गाठली नव्हती. उलट औंढा तालुक्यात दिवसेंदिवस जोराचा पाऊस होत असून शनिवारीही २६ मिमी पाऊस झाला. कळमनुरीत पहिल्यांदा विक्रमी ७५ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल वसमतमध्ये ४१ मिमी पाऊस झाला. यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ३ वीज खांब कोसळलेहिंगोली तालुक्यातील राजवाडी शिवारात ३ विद्युत खांब कोसळले. पाऊस आणि वाऱ्यामुळे जमीन भुसभुशीत झाल्याने खांबांचे वजन सहन झाले नाही. राजवाडीतील ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागला. रविवारी ३ वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम सुरूच होते.संततधार पावसाने जलपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकरी सुखावला आहे.