शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कामगारांना थकलेली रक्कम आठवडाभरात मिळेल

By admin | Updated: August 11, 2014 01:54 IST

नांदेड : शासनाकडून महामंडळास देय असलेली ५०० कोटी रूपये ११ आॅगस्ट रोजी महामंडळास रोखीने प्राप्त होणार असून येत्या आठवडाभरात सदरील रक्कमेतील

नांदेड : शासनाकडून महामंडळास देय असलेली ५०० कोटी रूपये ११ आॅगस्ट रोजी महामंडळास रोखीने प्राप्त होणार असून येत्या आठवडाभरात सदरील रक्कमेतील कामगारांचे महामंडळाकडे थकित असलेले २१० कोटी रूपये पुढील आठवडाभरात कामगारांना रोख स्वरूपात मिळतील, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिली़प्रशासन व शासनस्तरावर नुकत्याच झालेल्या बैठकीत उद्योग व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्यामुळे १२ आॅगस्ट रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही ताटे यांनी सांगितले़ तसेच शासनाकडून मिळत असलेल्या रक्कमेतील २१० कोटी रूपये वाटपाची तारीख निश्चित करण्यासाठी १२ आॅगस्ट रोजी एसटी महामंडळाचे चेअरमन यांच्यासमवेत संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे़ त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी एसटी कामगारांना कामगार करारातील थकबाकीची रक्कम प्रत्यक्ष मिळू शकते़ या बैठकीत प्रवासी कराचा दर १७़५ टक्क्यावरून १० टक्के करण्याच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यमंत्री मंडळापुढे प्रस्ताव सादर करून त्याची मान्यता मिळविण्याचे मान्य केल्याचे ताटे यांनी सांगितले़ विविध घटकांना दिल्या जाणाऱ्या सवलतीपोटी महामंडळास देय असलेले १४४७ कोटी रूपये मिळण्यासाठी एसटी महामंडळ करीत असलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून संबंधित विभागांना पुन्हा आदेश देण्याचे मान्य केले आहे़ रा़ प़ सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या पत्नीस, पतीस ५०० रूपये भरून वर्षभर मोफत प्रवास पास देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे़ यासह विविध मागण्यावर शासन आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने मुंबईत १२ आॅगस्ट रोजी होणारे धरणे आंदोलन स्थगित केल्याचे संघटनेचे सरचिटणीस ताटे, राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे, प्रादेशिक सचिव एम़ बी़ बोर्डे आदींनी कळविले आहे़ (प्रतिनिधी)