शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्त्यांचा ‘एसटी’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:14 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी करण्यात आलेली घोषणा खड्ड्यात गेली आहे. काही ठिकाणी खड्डे थातुरमातुर भरले तर काही ठिकाणी निधीच नाही म्हणून काम झाले नाही,

औरंगाबाद : मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी करण्यात आलेली घोषणा खड्ड्यात गेली आहे. काही ठिकाणी खड्डे थातुरमातुर भरले तर काही ठिकाणी निधीच नाही म्हणून काम झाले नाही, अशा खड्डेमय रस्त्यांचा ‘एसटी’ला सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. वारंवार स्प्रिंग तुटणे, टायर खराब होण्यासह संपूर्ण ‘एसटी’च खिळखिळी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांपर्यंत पोहोचविणाऱ्या रस्त्यांची अवस्था आजघडीला अत्यंत वाईट झालेली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल तर होत आहेतच; परंतु सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ‘एसटी’ला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ‘एसटी’तून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमधून सातत्याने ये-जा केल्यामुळे बसगाड्यांचे स्प्रिंग तुटण्यासह विविध पार्टस् खराब होत आहेत. या अनेक बसगाड्यांचे टायर ऐन रस्त्यात पंक्चर होत आहेत. अनेकदा दुसरे टायर उपलब्ध नसते. अशा वेळी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यासाठी धावपळ होते. विभागीय कार्यशाळेत दुरुस्तीसाठी येणाऱ्या बसेसमध्ये पैठण, सिल्लोड, कन्नड आगारातील बसगाड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खराब रस्त्यांमधून वारंवार बसेस गेल्यामुळे संपूर्ण बॉडीच खराब होत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळही संबंधित विभागाशी वेळोवेळी चर्चा करीत आहे.