बाळासाहेब जाधव, लातूरएस़टी़ महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने लातूर ते तुळजापूर मार्गावर २०० बसेस सोडण्यात आल्या़ या बसेसच्या माध्यमातून दहा दिवसात २० लाखाचे उत्पन्न मिळाले आहे़बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रिदवाक्याने सेवा देणाऱ्या लातुरच्या विभागीय कार्यालयाच्या वतीने लातूर तुळजापूर या मार्गावर २०० बसेस सोडण्यात आल्या़ यामध्ये नवरात्र महोत्सवात लातूर आगारातून ५६ बसेस, उदगीर ३३, अहमदपूर ३१ ,निलंगा ४०, औसा ४० अशा एकूण दोनशे बस लातूर -तुळजापुर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत़ या कलावधीत १ लाख ९४ हजार ६८ हजाराचे उदिष्ट देण्यात आले होते़लातूर आगारातून तुळजापूर येथे सुरू करण्यात आलेल्या २०० बसच्या नियोजनासाठी ४ सुपरवायझर, आॅफिसर व ५ डेपोमॅनेजर यांची नियुक्ती करण्यात आली होती़तसेच अनेक गावातून बहूसंख्येने गेलेल्या प्रवाशासाठीही थेट गावात सोय करण्यात आली होती़एसटी महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या यात्रा महोत्सवातील बसेसना भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला़ या माध्यमातून दहा दिवसात २० लाखाचे उत्पन्न मिळाले़ त्यामुळे लातूर विभागातील अधिकारी ,कर्मचारी, वाहक, चालक यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे़एसटीच्या लातूर विभागीय कार्यालयातून मंगळवारी व बुधवारी पोर्णिमेनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गर्दी होते या जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते़ हे भाविक जातांना लातूर, उमरगा, औसा, निलंगा, अहमदपूर, उदगीर, भालकी, बीदर, बस्वकल्याण, सोलापूर, बार्शी आदी ठिकाणाहून पायी जातात या भाविकांची सोय व्हावी या दृष्टीकोनातून लातूर विभागीय कार्यालयाच्या वतीने आणखी दोनशे बसेसचे नियोजन करण्यात आले़या माध्यमातून एसटीच्या उत्पन्नात आणखी वाढ होणार असल्याचे विभाग नियंत्रक डी़बी़माने यांनी सांगितले़
‘एसटी’ला तुळजाभवानी पावली
By admin | Updated: October 7, 2014 00:15 IST