दीड महिन्यांपासून बंद असलेल्या बसमुळे सर्व कामे व प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबून पडली होती. मात्र आता बस सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. सिल्लोड आगाराच्या घाटनांद्रा रस्त्यावर दररोज तीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून सिल्लोड बसस्थानकावरून बसची फेरी सकाळी साडेआठ, दुपारी बारा व दुपारी तीन वाजेदरम्यान सुटणार आहे. सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख आनंद चव्हाण यांनी दिली. तर पाचोरा आगाराची पाचोरा ते औरंगाबाद व सोयगाव आगाराची सोयगाव ते औरंगाबाद या बसेसदेखील सुरू झाल्या असल्याची माहिती आगारप्रमुख आनंद चव्हाण, अंभोरे, गवारे, वाहतूक नियंत्रक मुरकुटे, चव्हाण, वाहक चंद्रकांत बन्सोड यांनी दिली.
फोटो : घाटनांद्रा येथील बसस्थानकावर सोमवारी आलेली एसटी बस.
070621\datta revnnath joshi_img-20210607-wa0026_1.jpg
घाटनांद्रा येथील बसस्थानकावर सोमवारी आलेली एसटी बस.