शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
3
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
4
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
5
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
6
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
7
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
8
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
9
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
10
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
11
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
13
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
14
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
15
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
16
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
17
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
18
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
19
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या

दहावीचा निकाल ७८.५३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 23:46 IST

हिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदाही चांगला लागला आहे. नियमितचा ८0.९३ टक्के तर पुरवणी परीक्षेचा ३९ टक्के निकाल लागला लागला

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्याचा दहावीचा निकाल यंदाही चांगला लागला आहे. नियमितचा ८0.९३ टक्के तर पुरवणी परीक्षेचा ३९ टक्के निकाल लागला लागला असून सरासरी ७८.५३ टक्के आहे. यंदाही मुलींनीच मुलांपेक्षा वरचढ कामगिरी केली आहे. तर सेनगाव तालुक्याचा सर्वाधिक ८५.७३ टक्के निकाल लागला आहे.हिंगोली जिल्ह्यात नियमितसाठी २0४ शाळांमधून १६८८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ९२३१ मुले तर ७६५२ मुली होत्या. यापैकी १६७४0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी १३५४७ जण उत्तीर्ण झाले. यात ७0७९ मुले व ६४६८ मुलींचा समावेश आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७७.४७ तर मुलींचे ८५ टक्के एवढे आहे. त्यामुळे मुलींनीच यंदाही बाजी मारल्याचे दिसते.हिंगोली तालुक्यातून ४७ शाळांतील ४२२४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी तर ४१७0 प्रत्यक्ष हजर राहिले. यापैकी १७८९ मुले व १५४८ मुली उत्तीर्ण झाल्या. तालुक्याचा निकाल ८0.0२ टक्के लागला आहे. कळमनुरी तालुक्यातील ४५ शाळांतून ३३९६ नोंदणी केलेल्यांपैकी ३३८८ जणांनी परीक्षा दिली. यात १३२१ मुले तर १३७७ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुक्याचा निकाल ७९.६३ टक्के लागला आहे.वसमत तालुक्यातील ४४ शाळांमधून ४५४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर ४५२0 जण परीक्षेस बसले होते. यापैकी १९९५ मुले व १७७९ मुली उत्तीर्ण झाल्या असून तालुक्याचा निकाल ८३.५0 टक्के लागला आहे.सेनगाव तालुक्यात ४२ शाळांतील नोंदणी केलेल्या २५८३ पैकी २५५0 जणांनी परीक्षा दिली. तर यापैकी १२३८ मुले व ९४८ मुली उत्तीर्ण झाल्या असून तालुक्याचा निकाल ८५.७३ टक्के आहे.औंढा नागनाथ तालुक्यात २६ शाळांतील नोंदणी केलेल्या २१३७ विद्यार्थ्यांपैकी २११२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ७३६ मुले तर ८१६ मुली उत्तीर्ण झाल्या. या तालुक्याचा निकाल ७३.४८ टक्के एवढा लागला आहे. हा जिल्ह्यात सर्वात कमी निकाल आहे.हिंगोली जिल्ह्यात पुरवणी परीक्षेला १0३५ विद्यार्थ्यांनी नोंद करून १0३१ जणांनी परीक्षा दिली. उत्तीर्ण ४0९ झाले. यात ३0४ मुले व १0५ मुली आहेत.