शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

श्री मुक्तेश्वर मंदिरात २४ तास रुद्राभिषेक

By admin | Updated: November 28, 2014 01:11 IST

औसा : शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिराचा कलशारोहण समारंभ रविवारी तीन पीठांच्या जगद्गुरुंच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त २४ तास मुक्तेश्वरास रुद्राभिषेक सुरू करण्यात

औसा : शहराचे ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर मंदिराचा कलशारोहण समारंभ रविवारी तीन पीठांच्या जगद्गुरुंच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त २४ तास मुक्तेश्वरास रुद्राभिषेक सुरू करण्यात आल्याची माहिती मुक्तेश्वर देवालय कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली. औसेकरांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत असलेल्या श्री मुक्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार बसवराज पाटील, माजी आमदार पाशा पटेल व अन्य भाविकांच्या निधीतून करण्यात आले आहे. ४५ फूट रुंद व ११० फूट लांबीच्या सभागृह मंदिराचा जीर्णोद्धार व कलशाचे बांधकाम करण्यात आले आहे. या कलशारोहण कार्यक्रमानिमित्त२४ तास महारुद्राभिषेक होत आहे़ शुक्रवारी नंदीची स्थापना, शनिवारी ‘श्रीं’च्या मूर्तीसह कलशाची शहरातून मिरवणूक काढण्यात येईल़ त्यानंतर दुपारी जगद्गुरुंचे आशिर्वचन होईल़ रात्री ह.भ.प. गुरुबाबा महाराज यांचे चक्रीभजन होईल़ रविवारी कलशारोहण कार्यक्रम आणि महाप्रसाद होणार आहे. कार्यक्रमास औसा, लातूर, उस्मानाबाद, सोलापूरसह अन्य ठिकाणचे भाविक उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशनही होणार असून, भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अ‍ॅड. मुक्तेश्वर वागदरे यांनी केले आहे. यावेळी अ‍ॅड. भीमाशंकर कारंजे, विजयकुमार मिटकरी, महिशंकर उटगे, अ‍ॅड. विजयकुमार कारंजे, धनंजय कोपरे, दादा कोपरे यांच्यासह देवालय कमिटीचे सदस्य व मुक्तेश्वर मंदिराचे पुजारी वीरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)४या कार्यक्रमास काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन पीठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत हा कलशारोहण कार्यक्रम होणार आहे. श्री ष.ब्र. १०८ शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली १६ शिवाचार्य तसेच ह.भ.प. गुरुबाबा महाराज व गहिनीनाथ महाराज हेही उपस्थित राहणार आहेत.