शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

क्रीडा प्रशिक्षणांचाही पडला ‘दुष्काळ’ !

By admin | Updated: May 6, 2015 00:29 IST

महेश पाळणे, लातूर उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, क्रीडा प्रशिक्षणांचा मोसम. विविध खेळांच्या क्रीडा प्रशिक्षणांची रेलचेल या दरम्यान असते.

महेश पाळणे, लातूरउन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या की, क्रीडा प्रशिक्षणांचा मोसम. विविध खेळांच्या क्रीडा प्रशिक्षणांची रेलचेल या दरम्यान असते. त्यातच शासनाच्या कृपेवरून खेळाच्या संख्येने शंभरीच्या वर संख्या गाठली आहे. मात्र लातूर शहरात व जिल्ह्यात मोजक्याच खेळांच्या संघटना उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत आहेत. त्यामुळे भर दुष्काळातही क्रीडा प्रशिक्षणांचा दुष्काळ क्रीडा क्षेत्राला जाणवत आहे. क्रीडा संघटना व क्रीडा कार्यालयामार्फत उन्हाळ्यात जास्त कालावधीचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येतात. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातूनच खेळाडूंच्या कौशल्याचा विकास होतो. त्यांच्यातील आत्मविश्वास व अचूकताही यातूनच वाढते. उत्तम खेळाडू तयार करायचे असल्यास यासारख्या शिबिरांची आवश्यकता असते. शारीरिक क्षमता, सांघिक भावनाही यातून वृद्धिंगत होते. शहरातील व जिल्ह्यातील चित्र पाहता दहा ते बारा खेळांच्या माध्यमातूनच या शिबिराचे आयोजन आहे. त्यातील क्रीडा कार्यालयामार्फत चार, संघटनेमार्फत अवघ्या तीन तर उर्वरित प्रशिक्षणात विविध खाजगी क्रीडा मंडळे व क्लबचीच संख्या आहे. त्यामुळे क्रीडा संघटनेच्या मुख्य उद्देशाला हुलकावणी मिळाली आहे. केवळ संघ पाठविणे व स्पर्धा घेणे यावरच जिल्ह्यातील काही क्रीडा संघटनांचा रस दिसतो. यामुळे खेळाडू घडविण्याच्या मुख्य उद्देशाला बगल मिळत आहे.