शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

विशेष व्यक्तींना न्याय मिळेना

By admin | Updated: January 15, 2016 00:16 IST

औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत.

औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत. त्यामुळे योजना असूनही विशेष व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही, त्याचा त्यांना योग्य लाभ मिळत नाही आणि न्याय दिला जात नाही, असा खेद सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. शहरातील बीड बायपास येथील लॉन्सवर आयोजित साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (अपंग हक्क विकास मंच) यांच्या वतीने आयोजित ६ व्या अखिल भारतीय विशेष व्यक्तींच्या (अपंग) संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विशेष सत्रात ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आ. हेमंत टकले, दीपा क्षीरसागर, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, स्वागताध्यक्ष सुहास तेंडुलकर, विजय कान्हेकर, डॉ. रवींद्र नांदेडकर, नीलेश राऊत, सचिन मुळे यांची उपस्थिती होती.संमेलनातील ठराव :१) केेंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यात अपंगाची वेगळी रचना करावी. २) अपंग धोरणाची अंमलबजावणी करावी. ३) विशेष व्यक्तीतील साहित्यिकांची स्वतंत्र नोंदणी करावी. पुरस्कार वितरणउपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण शिवाजी गाडे व धर्मेंद्र सातव यांना करण्यात आले. संस्कार ग्रुप (पुणे) यांच्यातर्फे संस्कारभूषण पुरस्कार पीयूष द्विवेदी (साहित्य), गजानन वाघ (प्रशासकीय सेवा), कोमल बोरा (क्रीडा), चेतना अपंग मती विकास संस्था यांना देण्यात आला. तसेच तारामती बाफना अंध विद्यालय (औरंगाबाद) यांना अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या ब्रेन लिपीतील पुस्तकांची भेट देण्यात आली. यानंतर खंडेराव मुळे, राजेश ठाकरे, परिमल भट्ट, पवन खेबुडकर यांच्या यशोगाथेविषयी प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. वर्षभर तरी गोड बोला सुप्रिया सुळे म्हणाल्या, नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. संक्रांतीचा सण आहे. आता काही निवडणुकाही नाहीत. तेव्हा सरकारने तीळगुळ घेऊन वर्षभर तरी गोड बोलावे, हे राजकीय व्यासपीठ नाही, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.