शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

कयाधू नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष अभियान

By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST

हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी देशातील व राज्यातील विविध जल व पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विदर्भ - मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील एकमेव ‘कयाधू’ नदी ४० वर्षापूर्वी सातत्याने प्रवाहित होत होती. अलिकडच्या काळात किमान सहा महिने ती कोरडीच राहत आहे. या नदीच्या काठावर श्री संत नामदेव महाराजांचे समाधीस्थळ असलेले नर्सी हे गाव असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. श्री गुरूगोविंदसिंग यांच्या आदरस्थानी श्री संत नामदेव राहिल्यामुळे शीख धर्मियांचे हे पवित्र स्थान आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असलेले हिंगोली शहरही याच नदीच्या तिरावर वसलेले आहे. त्यामुळे सदर नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यासाठी नर्सीपासून विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. या अभियानासाठी कयाधू नदी पुनरुज्जीवीका समिती स्थापन करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याच्या दृष्टीने रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्रसिंग राणा (तरुण भारत संघ राजस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पॅटर्नचे जनक अभियंता सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया (मानवलोक, अंबाजोगाई), महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. डी. एम. मोरे, सुनील जोशी (जलबिरादरी, पुणे), शांताराम पंदेरे, अभिजित घोरपडे, मुकुंद धाराशिवकर, डॉ. दत्ता देशकर, विनोद रापतवार यांच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राबविण्याचे ठरले आहे. या मोहिमेसाठी हिंगोलीतील कयाधू नदीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंग राणा, डॉ. सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया, शांताराम पंदेरे, सुनील जोशी ही तज्ज्ञ मंडळी १५ व १६ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती कयाधू नदी पुनरूज्जीविका कार्यक्रमाचे समन्वयक जयाजी पाईकराव यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)