शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जागा लाटण्याचा डाव

By admin | Updated: July 24, 2015 00:49 IST

बीड : शहरातील खासबाग परिसरातील वनविभागाच्या जागेत नगर परिषदेने गाळे उभारल्याचा वाद उफाळला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी

बीड : शहरातील खासबाग परिसरातील वनविभागाच्या जागेत नगर परिषदेने गाळे उभारल्याचा वाद उफाळला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याचे उत्तर न दिल्याने हे प्रकरण आता चिघळले आहे.वनविभागाच्या मालकीची ३.९३ हेक्टर आर जमीन आहे. १९८२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नर्सरीसाठी ही जागा दिली होती. त्यावेळी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग हे स्वतंत्र होते. दरम्यान, १९९५-९६ च्या कालावधीत नगर परिषदेने वनविभागाच्या जागेवर गाळे बांधले होते. हे गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. पीटीआरवर मालकाचे नाव मुख्याधिकारी, नगर परिषद असे नमूद करण्यात आले आहे.पालिकेने खासबाग येथील वनविभागाच्या परिसरात डिसेंबर २०१४ मध्ये ठराव घेतला होता. फेब्रुवारी २०१५ मध्ये या जागेचा ताबा एका संघटनेला देत पीटीआर दिले होते. या गाळ्यामध्ये वनविभागाने काही साहित्य ठेवले होते. बुधवारी सकाळी फारूक पटेल व काही जण तेथे आले व त्यांनी गाळ्याचे कुलूप तोडून भिंत पाडली. हे गाळे आपल्याला लीजवर दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर वाद उफाळून आला होता. पोलिसांना माहिती देताच फौजफाटा येथे दाखल झाला होता. वनविभागाचे अधिकारी नगर परिषदेमध्ये गेले होते. मात्र, तेथे मुख्याधिकारी नव्हते. त्यामुळे त्यांनी नगर रचनाकार जैन यांच्याशी संपर्क साधून या जागेचा नकाशा दाखविला.पीआर कार्ड वनविभागाच्या नावेनगर परिषदेमार्फत देण्यात येणारे पीटीआर हे कर आकारणीस पात्र असलेल्या इमारती व जमिनीच्या कर आकारणी सूची दर्शविणारे असते. शहर भूमापन यांच्या आखीव पत्रिका अर्थात पीआर कार्डनुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून संयुक्त मोजणी अहवाल सादर केल्यानंतर ३.९३ हेक्टर आर जमीन वनविभागाच्या मालकीची आहे.वनविभागाने केला होता मुख्याधिकाऱ्यांशी पत्रव्यवहारजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बीड येथील खासबाग फॉरेस्ट गट क्रमांक १३०, १३१, १३३ मधील ३.९३ हेक्टरपैकी २.९२ हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष मोजणी जिल्हा निरीक्षक अभिलेख यांनी ४ सप्टेंबर १९८२ रोजी केली होती. संयुक्त मोजणी अहवाल केल्यानुसार वनविभागाने जमीन ताब्यात घेतली आहे. सदर क्षेत्रात वनअधिनियम १९२७ व भारतीय वन अधिनियम १९८० कलम लागू झाला आहे. गाळ्याशिवाय एका उर्दू प्राथमिक शाळेस जागा भाडेतत्वावर नगर परिषदेमार्फत देण्यात आलेली आहे. सर्व्हे नं. १३३ पैकी २५०० चौरस फूट आकाराची जागा शाळेचे मैदान विकसित करण्यासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे. मात्र चतु:सीमा चुकीची दर्शविण्यात आलेली आहे. वनविभागाची मालकी व ताबा असलेल्या जागेवर सदरील व्यक्ती आपल्या चुकीच्या पत्रानुसार व दस्तऐवजानुसार अतिक्रमण करीत आहे, असे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)गाळेधारकांनी वाद निर्माण केल्यानंतर वनविभागाचे अधिकारी नगर परिषदेत गेले होते. त्यावेळी नगर परिषदेचे अधिकारी ही जमीन आपली असल्याचे सांगत असताना तेथे सलीम ट्रेसर आले. ही जागा आपली असल्याचा दावा केला. नगर रचनाकार जैन यांच्या लक्षात हा प्रकार आला. सलीम ट्रेसरमध्ये हस्तक्षेप करीत होते, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.१९८२ साली ही जागा वनविभागास देण्यात आली होती. मात्र, अनाधिकृतरित्या नगर परिषदेने येथे गाळे बांधले आहेत.४ बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास माजी उपनगराध्यक्ष फारूक पटेल, मौलाना जकीर, सिद्दीकी युसूफ सिद्दीकी व इतर अनोळखी व्यक्ती तेथे गेले व त्यांनी गाळ्याला वनविभागाने लावलेले कुलूप तोडून भींत पाडण्याचा प्रयत्न केला. त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ४शहर ठाण्यात वनविभागाकडून सखाराम प्रल्हाद कदम यांच्या फिर्यादीवरून फारूक पटेल, मौलाना जकीर, सिद्दीकी युसूफ सिद्दीकी व अन्य लोकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.