शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सोयगावचे रोहित बिर्ला कतारमध्ये चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:06 IST

योगेश पायघन औरंगाबाद : प्रवासी भारतीय दिनानिमित्त शनिवारी (दि. ९) आभासी पद्धतीने आयोजित प्रवासी भारतीयांच्या संमेलनात ‘भारत को जानिये ...

योगेश पायघन

औरंगाबाद : प्रवासी भारतीय दिनानिमित्त शनिवारी (दि. ९) आभासी पद्धतीने आयोजित प्रवासी भारतीयांच्या संमेलनात ‘भारत को जानिये क्विझ’च्या १५ विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत सोयगाव येथील रोहित बिर्ला यांनी कतार येथे अनिवासी भारतीय गटातून बाजी मारली. विजेते केंद्र शासनाकडून १५ दिवसांच्या ‘भारत दर्शन’ यात्रेचे मानकरी ठरले.

कतार येथील भारतीय दूतावासातर्फे शनिवारी भारतीय सांस्कृतिक केंद्र, दोहा येथे १६ वे ‘प्रवासी भारतीय दिन संमेलन’ नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण आभासी पद्धतीने आयोजित केले होते. या कार्यक्रमास कतारमधील प्रख्यात भारतीय प्रवासी आणि कतारमधील भारतीय राजदूतासमवेत दूतावासअंतर्गत सर्वोच्च संस्थाप्रमुखांनी हजेरी लावली. कतार देशातील भारतीय राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्या हस्ते रोहित बिर्ला यांचा सन्मान करण्यात आला.

शैक्षणिक प्रवासातील यशानंतर अभियंता असलेल्या रोहित यांनी कॅम्पस सिलेक्शन होऊन कंपनीतही त्याच्या कर्तृत्वाला साजेल अशी कामगिरी केल्याने अनेकदा त्यांना गौरविले गेले. या स्पर्धेची तिसरी फेरी जिंकल्यावर त्यांनी चौथी फेरी जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सोयगाव येथील व्यापारी दिलीप बिर्ला यांचा मुलगा रोहित हे विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद प्रशाला सोयगावच्या शिक्षकांसह, विद्यार्थी, मित्रपरिवार, सोयगावकरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कोविडमुळे दीड वर्षांपासून मायदेशी येऊ न शकल्याचे सांगत लवकर परिस्थिती निवळल्यावर गावाकडे येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

...................................

विजेत्यांना केंद्राकडून १५ दिवस भारत दर्शन

परदेशी राहणाऱ्या युवा विदेशी भारतीयांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाद्वारे ‘भारत को जानिये क्विझ’ २०१५-१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या वर्षी २०२०-२१ चे हे तिसरे वर्ष होते. ३० सप्टेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान हे क्विझ चार फेऱ्यांत झाले. या स्पर्धेचा विजयी पुरस्कार म्हणून १५ दिवसांची भारत दर्शन यात्रा भारत सरकारमार्फ़त प्रायोजित असते. ती यात्रा कोविड संक्रमण नियंत्रणानंतर आयोजित केली जाणार असल्याचे रोहित यांनी सांगितले.

.........................

फोटो ओळ : रोहित बिर्ला यांचा सत्कार करताना कतार देशातील भारतीय राजदूत डॉ. दीपक मित्तल दिसत आहेत.