अगरवाडगाव, गळनिंब, भिवधानोरा आणि धनगरपट्टी परिसरात या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची पेरणी झालेली आहे. त्यातही शेतकऱ्यांचे सोयाबीन यंदा चांगलेच बहरले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाने अर्थात रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी यासाठी कृषी विभागाने मोठी मोहीम राबविली होती. परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे समजून घेऊन शेतकऱ्यांनी या परिसरात सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने केलेली आहे.
कोट
बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी केल्यास बियाणे कमी लागते. उत्पन्न चांगले मिळते, खर्चात बचत होते. उत्पन्नात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन केले गेले. कायगाव शिवारात बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे.
------------
फोटो :
भिवधानोरा आणि गळनिंब परिसरात बीबीएफ तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक घेतले आहे. हे पीक चांगले बहरले आहे. (छाया : तारेख शेख)
210721\img-20210717-wa0017.jpg
सोयाबीन पिक बहरले