शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी शाळांचे प्रलंबित प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:06 IST

बेमुदत उपोषण मागे : मेसा इंग्रजी शाळा संघटनेसोबत घेतली बैठक औरंगाबाद : मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या स्थानिक पातळीवरील प्रलंबित ...

बेमुदत उपोषण मागे : मेसा इंग्रजी शाळा संघटनेसोबत घेतली बैठक

औरंगाबाद : मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या स्थानिक पातळीवरील प्रलंबित मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. उपोषण, आंदोलने करूनही शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने १४ जानेवारीपासून मेसाने बेमुदत उपोषणाचा इशारा शिक्षणाधिकारी जयस्वाल यांना दिला होता. त्यामुळे जयस्वाल यांनी मेसाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून, सोमवारी बैठक घेत, शनिवारपर्यंत प्रलंबित मागण्या निकाली काढू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती मेसाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी दिली.

प्रथम शाळा मान्यता, आरटीई नमुना २ प्रमाणपत्र, नैसर्गिक वर्ग वाढ पुढील दोन दिवसात देण्यात येणार असून तालुकानिहाय आरटीई प्रतिपूर्ती वाटपासाठी शिबिरातच मंजुरी देणे, निधी प्राप्त होताच सन २०१८-१९ ची प्रतिपूर्ती ५० टक्के व २०१९-२० ची १०० टक्के प्रतिपूर्ती वाटप करण्यात येईल. याशिवाय शाळा संरक्षण कायद्‌याबाबत शासनस्तरावरून पाठपुरावा करण्यात येत असून शाळांवर हल्ला करणारे हल्लेखोर तसेच खंडणीच्या उद्देशाने शाळांना वेठीस धरणाऱ्या खंडणीखोरांविरुध्द पोलीस आयुक्त यांच्याकडे अहवाल देण्यात आला असल्याचे सांगून, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी मेसाच्या शिष्टमंडळास आश्वस्त केले.

शिष्टमंडळात मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, उपाध्यक्ष हनुमान भोंडवे, सरचिटणीस प्रवीण आहाळे, सुनील मगर, संजय पाटील, रत्नाकर फाळके, विश्वासराव दाभाडे, शेख झिया, कल्याणी सांगोले, पोपट खैरनार, संजय कुलकर्णी आदींचा सहभाग होता.