मसलगा : पावसाने गुंगारा दिल्याने शेतकरी धास्तावला आहे़ आहे़ वरूणराजा बरसावा म्हणून गौर येथील नागरिकांनी मंगळवारी टाळ, मृदंगाच्या गजरात दिंडी काढून वरूणराजाला साकडे घातले़ निम्मा पावसाळा संपत आला, मात्र अद्यापही दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ तसेच खरीप हंगामातील पिके हातची जात आहेत़ त्यामुळे हा हंगाम हाती लागणार नाही, अशी भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होऊ लागली आहे़ निलंगा तालुक्यातील गौर येथील मारूती मंदिरापासून मंगळवारी सकाळी सुहासिनींनी डोक्यावर कलश घेऊन दिंडी काढली़ २ कि़मी़ अंतरावर असलेल्या कोरड्या तलावावर गोवर्धनची स्थापना करण्यात येऊन पावसासाठी होमहवन करण्यात आला़ ४या दिंंडीत गावातील अबालवृद्ध सहभागी झाले होते़ वरूणराजा बरस रे, शेतकरी सुखी होऊ दे, अशी याचना करण्यात आली़ पावसासाठी वारकरी मंडळींना अंघोळ घालण्यात येऊन गावकऱ्यास जेवण देण्यात आले़ ४हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम सूर्यवंशी, बब्रुवान सावंत, प्रभू पाटील, विक्रम बोरोळे, महेश तावडे, माधव तोरणे, भाऊसागर देवमाने आदींनी परिश्रम घेतले़ औराद शहाजानी : पावसासाठी मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठाण करून अल्लाहकडे सोमवारी दुवा मागण्यात आली़ औराद शहाजानी व परिसरात यंदाच्या हंगामात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही़ पावसासाठी सोमवारी कादरीया मस्जिदचे मौलाना नसीम अख्तर यांनी नमाज पठण केले़ यावेळी रज्जाक नाईवाडे, बागवान दस्तगीर नायब, हमीदखाँ पठाण, पाशा भुत्ते, मकबूल फकीर, सराफ, मुक्तार बागवान आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
वरूणराजासाठी याचना
By admin | Updated: August 21, 2014 01:21 IST