शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कर भरणे हे नागरिकांचे सामाजिक दायित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:54 IST

कर चुकविण्याची मानसिकता बदलून नागरिकांनी स्वत:हून कर भरावा, असे आवाहन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशाची सुरक्षा, सुविधा, विकासकामे करायची असतील तर सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होणे आवश्यक आहे. यामुळे कर भरणे प्रत्येक नागरिकांचे सामाजिक दायित्व आहे. याकरिता कर चुकविण्याची मानसिकता बदलून नागरिकांनी स्वत:हून कर भरावा, असे आवाहन आयकर विभागाचे प्रधान आयकर आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव यांनी केले.आयसीएआयची स्थानिक शाखा व डायरेक्ट टॅक्स कमिटीच्या वतीने आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थित चार्टर्ड अकाऊंटंटला समाजात कर भरण्याविषयी जनजागृती करण्यासाठी आवाहन केले.सातारा परिसरातील आयसीएआय भवन आयोजित परिषदेत डायरेक्ट टॅक्स कमिटीचे उपाध्यक्ष सीए एन. सी. हेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर श्रीवास्तव यांनी सांगितले की, मार्च ते सप्टेंबर २०१६ दरम्यान औरंगाबाद विभागात ५०० कोटींची अघोषित संपत्ती जाहीर झाली आहे.मागील आर्थिक वर्षात विभागाने ११०० कोटींचे करसंकलन के ले आहे. ३ लाख ५५ हजार करदाते असून, मागील वर्षात यात नवीन दीड लाख करदात्यांचा समावेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी स्वागतपर भाषण सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावका व सीए उमेश शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन प्रणव राठी, गौरी पंडित यांनी तर पंकज सोनी यांनी आभार मानले. परिषदेचा रविवारी शेवटचा दिवस असून, यात अ‍ॅड. कपिल गोयल, सीए चंद्रशेखर चितळे, सीए एम. आर. हुंडीवाला, सीए चैतन्य के. के., सीए जगदीश पंजाबी मार्गदर्शन करतील.