जालना: शहराजवळील एका पेट्रोल पंपावर अज्ञात चार चोरट्यांनी गुरूवारी भल्या पहाटे धुमाकूळ घातला. चोरट्यांनी पंपाच्या कॅबीनची तोडफोड केली. तसेच कपाट फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी काही लोक धावून आल्याने चोरटे पसार झाले. मंठा बायपास मार्गावर नव्यानेच झालेल्या जयलक्ष्मी पेट्रोल पंपावर गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास चार चोरटे आले होते. हातात लोखंडी गज व काठ्या होत्या. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने कॅबिनच्या काचा फोडून आत प्रवेश केला. आतील कपाट लोखंडी गजाच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. कपाट फोडीत असतानाच जवळील जवळील ढाब्यावरील काही लोक धावून आले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच तालुका जालना पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पंप चालक नरेंद्र वसंतराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि काळे हे करीत आहेत.
चोरट्यांचा पेट्रोल पंपावर धुमाकूळ
By admin | Updated: May 30, 2014 00:27 IST