दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा खोटा मेसेज खोडसाळपणे सोशल मीडियात फिरविण्यात आला. संबंधितांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोेमवारी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्या नावेही चुकीचा मेसेज सोशल मीडियात फिरत होता. त्यानंतर, बुधवारी जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या नावे चुकीचा संदेश पसरविण्यात आला. यामध्ये कोरोना तिसऱ्या स्टेजवर पोहोचला आहे. त्यामुळे शेजारी जाणे, गरम पाणी पिणे, बेकरीचे सामान खाणे, वृत्तपत्रे बंद करा किंवा दुसऱ्या दिवशी वाचा, कुरिअर स्वीकारू नका, ऑनलाइन फूडसेवा बंद करा, यांसारखे अनेक मुद्दे त्यात आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे, सोशल मीडियातून ‘औरंगाबाद कलेक्टरकडून सूचना’ अशा आशयाचा मेसेज सर्वत्र फिरत आहे. हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे. वरील मुद्दे नमूद असलेला कोणताही आदेश, सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी यावर विश्वास ठेऊ नये, तसेच फॉरवर्डही करू नये.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे फिरणारा तो एसएमएस चुकीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST