शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीची शुक्रवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:07 IST

केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची मागील वर्षीच निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची मागील वर्षीच निवड झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा निधीही महापालिकेला प्राप्त झाला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाºया कामांना अद्याप कोणतीही गती मिळालेली नाही. आतापर्यंत स्मार्ट सिटीसाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्हीच्या तीन बैठका झाल्या आहेत. चौथी बैठक ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्याच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव तथा एसपीव्हीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा उपस्थित राहणारआहेत.केंद्र आणि राज्य शासनाने स्मार्ट सिटीअंतर्गत मनपाला २०० कोटींहून अधिक निधी दिला आहे. महापालिकेने हा निधी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाºया कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सीएचटूएम या प्रकल्प सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. समितीकडून अद्याप आराखडे तयार करण्याचेच काम सुरू आहे. दरम्यान, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले की, ११ आॅगस्ट रोजी आयोजित बैठकीस अपूर्व चंद्रा येणार आहेत. बैठकीत स्मार्ट सिटीचे सर्व सदस्यही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत मनपा विविध प्रस्ताव सादर करणार आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी बसेस खरेदी किंवा पर्यायी व्यवस्था आदी उपाययोजना देण्यात येणार आहेत. स्मार्ट स्कूल, लीड लाईट, घनकचरा प्रकल्प आदी प्रस्ताव राहणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. एसपीव्ही अध्यक्ष आणि सदस्य यावर अंतिम निर्णय घेतील आणि येणाºया काही दिवसांमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.